Saturday, December 29, 2012

सवय आहे तुझी वाट पाहन्याची...

सवय आहे तुझी वाट पाहण्याची
तु येणार नसतांनाही
सवय आहे तुझ्याशी गप्पा मारण्याची
तु ऐकत नसतांनाही
सवय आहे तुला पाहत बसण्याची
... तु समोर नसतांनाही
सवय आहे रोज रात्री तुझ्या एका sms ची वाट पाहण्याची
तो येणार नसतांनाही
सवय आहे मन मारुन झोपण्याची
झोप येणार नसतांनाही
सवय आहे अशा कित्येक सवयी सोबत घेऊन जगण्याची
तुझ्याशिवाय जगणे शक्य होत नसतांनाही

No comments:

Post a Comment