Thursday, November 8, 2012

सोनपरी

वाटल नव्हत कधी असही कधी घडेल.....! एक गोड सोनपरी माझ्या प्रेमात पडेल.... इटुकल्या - पिटुकल्या मेसेज मधून मला वाकुल्या दाखवेल..... हळूच एखादा MISS CALL करून मला ती सतावेल..... वाटल नव्हत कधी असहीकधी घडेल.....! स्वप्नामध्ये माझ्याहळूच कोणीतरीशिरेल..... बोलायला"काहीच नाही"म्हणून फोनवर तासभर बोलेल.... आणि नेमक महत्वाच बोलताना फोन ठेवण्याची घाई करेल..... वाटल नव्हत कधी असहीकधी घडेल.....! माझ्याही आठवणीत रात्रभर कोणीतरी जागेल..... तिच्या विरहाचे चार दिवस चार जन्माचे अंतर दाखवेल..... आणि तास-दोन तासांचीभेट सुद्धा क्षणभर वाटेल..... वाटल नव्हत कधी असहीकधी घडेल....! या एकाकी जीवनामध्ये त्या परीचा प्रेमाचा स्पर्श लाभेल...... वाटल नव्हत कधी असहीकधी घडेल.....! एक गोड सोनपरी माझ्या प्रेमात पडेल....

मुले असतातच असे

मुले .........असतातच असे.... एखाद्या मुलीवर मनापासून प्रेम करणारे, ती आपली होऊ शकत नाही हे माहीत असून फ़क्त तिच्यावरच प्रेम करणारे... - मुले .........असतातच असे.... तिचे सर्व हट्ट पुरवणारे, फक्त तिला सुखात पाहण्यासाठी सतत निस्वार्थी प्रयत्नात असणारे... - मुले .........असतातच असे.... स्वतः खोडी काढणारे, पण ती रागावली आहे हे पाहून तिला पुन्हा आनंदाश्रूंतभिजवणारे... - खरच काही मुले.........असतातच असे .... माझ्या सारखे... हरवलेल्या गर्दित देखील स्वताला विसरून त्यात आपले प्रेम शोधणारे.......! !!

प्रेम फसवे असते

तु माझी, मी तुझा, सांगायला बरे वाटते, लोकांना तुझे माझे नाते प्रेम वाटते, सांगुन थकलो त्यांना की दिसते तसे नसते... म्हणुन तर म्हणतो - प्रेम फसवे असते .