Sunday, December 30, 2012

अधुरे प्रेम...

♥एक छोटीशी प्रेम कहाणी..♥
एक मुलगा नेहमी आनंदात असयचा..
हसत खेळत आपला दिवस घालवायचा....
त्याने कधी विचार नाही केलाकि......
त्यालाहि कधी प्रेम होईल....
एकदा नेहमी प्रमाणे तो कॉलेजला गेला..
थोडा थोडा पाऊस पडत होता...
मित्रान बाबोबर तो lecture ला गेला
lecture चालू होते....
तितक्यात एक मुलगी पावसात्न... आलेली..
थोडीशी भिजलेली...
सर का मी आत येऊ....
त्या मुलाने मुलीला बगीत्ल...
बस मग काय....
ते म्हणतात ना ...
कि प्रेम होण्यासाठी एक क्षण पण खूप
असतो..
म्हणून....
असच.. काही त्या मुला बाबोबर.. झाल..
मित्रान बाबोबर असूनही.. दुसरी कडे
लक्ष..
मित्र बोलायचे ओये हिरो चल आज
सिनेमाला जावूया..
काही बहाणा बनवून दरोज lecture
करायला जायचा..
फक्त त्या मुलीला बगन्यासाठी...
दोघाची ओळखही झाली...
ते दरोज भेटायचे...
पण त्या मुलाने आणखी तिला सांगितल..
नवतं कि तो तिच्यावर प्रेम करतोय
म्हणून...
शेवटची exam चा शेवटचा पेपर होता..
मुलाने विचार केला कि आज
तिला सगळकाही..
मनातल सांगायचं आणि तिला आपल
बनवायचं....
मुलगा मनातल्या मनात खूप खुश होता....
त्याचे हृदयाचे ठोके सुद्धा वाढले होते....
तो मुलगा कॉलेजच्या गेटवर उभा होता...
ती येईल या आशेवर...
त्याला त्याच्या प्रेमावर पूर्ण
भरोसा होता...
पण त्याने जसा विचार केला तास
काही झाल नाही...
ती मुलगी आलीच नाही...
आणि त्या नंतर
ती मुलगी त्या मुलाला कधीच
भेटली नाही......
एक मुलगा ज्याने एका मुलीवर जीवापाड...
प्रेम केले..
जे कधी संपले नाही......
पण.........
ते कधी त्याला मिळालेच नाही......

"प्रेम"

प्रेम" हा असा शब्द आहे की, . जो एखाद्या मुलाला समजला तर मुलीला समजत नाही...!!! . जर तो मुलीला समजला तर मुलाला समजत नाही......!!! आणि... . . जर तो दोघांनाही समजला तर जगाला समजत नाही... . बरोबर आहे ना?

Saturday, December 29, 2012

सवय आहे तुझी वाट पाहन्याची...

सवय आहे तुझी वाट पाहण्याची
तु येणार नसतांनाही
सवय आहे तुझ्याशी गप्पा मारण्याची
तु ऐकत नसतांनाही
सवय आहे तुला पाहत बसण्याची
... तु समोर नसतांनाही
सवय आहे रोज रात्री तुझ्या एका sms ची वाट पाहण्याची
तो येणार नसतांनाही
सवय आहे मन मारुन झोपण्याची
झोप येणार नसतांनाही
सवय आहे अशा कित्येक सवयी सोबत घेऊन जगण्याची
तुझ्याशिवाय जगणे शक्य होत नसतांनाही

Thursday, December 27, 2012

तेजस्वी तारयापेक्षा हि तेजस्वी चेहरा तुझा .........


तेजस्वी तारयापेक्षा हि तेजस्वी चेहरा तुझा .........

बोलके असे तुझे डोळे पाहत रहावेसे वाटतात ..........

तुझे कोमल केस मला एका सुंदर निर्मल झर्यासारखे वाटतात .......

तुझ्या हृदयस्पर्शी डोळ्यांना आणि केसांना पाहून सहज हरवून जाईल हे मन

तुला सारखा पाहत रहावसं वाटत एका वेगळ्याच जगात रमून जावसं वाटते

देवाकडे फक्त तुझ हसूच मागावस वाटते आणि तुला समोर बसवून तुझ हसू पाहत रहावस वाटते ........

तुझ हसूच पाहत रहावस वाटते ...........
63Like ·  · 

" गेले ते दिवस " " राहील्या त्या फक्तआठवणी "


आठवणी येतात,
आठवणी हसवतात,
आठवणी रडवतात,
काहीही न बोलता
आठवणी निघून जातात,
तरीही आयुष्यात
आठवणीच राहतात।
याना सांभाळून ठेव,,,
कारण जेव्हा कुणीहीनसतं,
तेव्हा आपल्या जवळ फक्त
या आठवणीच उरतात....
अन् असे म्हणतात ना की....
" गेले ते दिवस " " राहील्या त्या फक्तआठवणी "
211Like ·  · 

Friday, December 21, 2012

तुझ माझ्यावर खुप प्रेम असाव.....


87Like ·  · 

Wednesday, December 19, 2012

ह्यालाच तर प्रेम म्हणतात....

ह्यालाच तर प्रेम म्हणतात....
तु माझ्यापासून दूर
माझ्या हृदयात आठवणींचे पूर
तुझ्या गोड आठवणीच मला
दिवस रात्र स्मरतात
ह्यालाच तर प्रेम म्हणतात....
काही क्षण आपण एकमेकांसोबत घालविले
कधी मी तर कधी तु मलाहसविले
पण थोडयाश्या आठवणीही जेव्हा
हृदयात खोल रुततात
ह्यालाच तर प्रेम म्हणतात....
आपण एकमेकांना भेटलो
काही काळ एकमेकांसाठी जगलो
स्वतःसाठी न जगता जेव्हा
दोन जीव एकमेकांसाठी जगतात
ह्यालाच तर प्रेम म्हणतात....
जेव्हा रडू तुला आलेकी
अश्रू माझे वाहायचे
जेव्हा हसू मला आले की
डोळ्यात तुझ्या चमकायचे
दुख असो की आनंद
जेव्हा दोघ एकत्र अनुभवतात
ह्यालाच तर प्रेम म्हणतात....
प्रेम कधीही होऊ शकते
कोणावरही होऊ शकते
कधी झाडावर तर
कधी मातीवर होऊ शकते
जेव्हा कुठच्याही नात्याची
मुळे खोलवर रुजतात
ह्यालाच तर प्रेम म्हणतात....
ह्यालाच तर प्रेम म्हणतात....

खुप वेडा होतो मी तिच्यासाठी...

मीच केले तिच्यावर प्रेम
कारण खूप वेडा होतो तिच्यासाठी
पण तिने ते कधी समजूनच नाही घेतले....
वाटायचे मला कळेल तिला
खूप वेडा होतो मी तिच्यासाठी
तिच्यावर खुप प्रेम करायचो ...
आठवण तिची आल्यावर
कविता करत बसायचो ..
कधी तिच्या केसांत गुंतायचो ,
कधी तिच्या डोळ्यात बुडायचो,
कधी तिच्या ओठांवर अडकायचो,
तर कधी गालवर
गोड हसू आणायचो...
नेहमी काहीना काही उपमा द्याचो
आज परी तर उद्या सरी..........!
प्रेम फक्त मीच करतोअसे काही वागायचो ..
पेनाची शाई संपली तरी शब्द काही संपे ना
माझ्या कविता तिला हट्टाने दाखवायचो
कवितेतील तीच तू अशीजाणीव तिला दयाचो...
कवीता तिला आवडली कीवही मागे चेहरा लपवून
खुप गोड हसायची ती............ !
पण कवीता तिला कधीच समजली नव्हती
कारण प्रेम फक्त मीचकरायचो......... ­... .!
आज नाही माझ्या आयुषात ती
तरी कवीता करतोय.......... ­.!
एक आठवण म्हणुन,
एक समाधान म्हणुन,
पण शेवटी आज ती मला सोडून गेली आहे
माझ्या कविता माझ्या जवळच आहेत....
खूप वेडा होतो मी तिच्यासाठी
खुप प्रेम करायचा तिच्यावर......! ­!!!!!

Monday, December 17, 2012

आयुष्यात कुणी असे भेटावे..

एकदातरी आयुष्यात कुणी असे भेटावे
ज्याला आपल्या मनातले सर्व कही सांगावे,
संगता संगता आयुष्य पूर्ण सरून जावे,
आणि सर्तानाही आयुष्य
पुन्हा पुन्हा जगावे ......
एकदा तरी आयुष्यात कोणी असे भेटावे,
ज्याला घेवून सोबतीने खुप खुपछलावे,
चलता दुरवर खुप खुप थकावे ,
पण थकल्या वरही आधारसाठी त्यच्या कडेच
पाहावे......... ­ ­....
एकदातरी आयुष्यात कोणी असे भेटावे,
दुख त्यचे आणि आश्रूमाझे आसवेत,
त्याच्या साथी मी जगताच रहावे जगताच रहावे
आणि त्यच्या साठी जगतानाच आयुष्य सरून
जावे ...............
एकदातरी आयुष्यात कोणी असे भेटावे
ज्याच्या सोबतीला प्रतेक क्षणाने सुखावे,
उनत त्याने सावली तरपावसात थेम्ब व्हावे,
आणि मायेच्या थेम्बानी मी ,चिम्ब भिजुन जावे ,
एकदातरी कोणी असे भेटावे ,सुर
त्याचा आणि शब्थ माझे असावे....

प्रेम मौल्यवान असतं!

जीवापाड प्रेम केल्यावर कळत की, ... प्रेम म्हणजे काय असतं.. तुम्ही
प्रेम कोणावर ही करा, पण ज्याच्यावर
कराल त्याच्यावर अगदी शेवट पर्यन्त करा.., कारण प्रेम हे मौल्यवान असतं..!!
तुझ्याविणा कोणाकडे पाहावतच नाही,अजुनही मला तुझ्याशिवाय राहवतचनाही.

सर... पॅँट फाटली आहे :P

परीक्षे मध्ये मास्तर खुप कडक असतो आणि पेपर पण कठीण असतो , चिटीँग पण करता येत नसते. . शेवटचा बेँचवर बसलेल्या गण्याने परीक्षकला एक चिठ्ठी दिली. . परीक्षकाने चिठ्ठी वाचली आणि चुपचाप आपल्या खुर्चीवर जाऊन बसला. . गण्याचा पुढे बसलेल्या मिञाने विचार:- यार तु काय लिहल होत त्या चिठ्ठीत? . . गण्या- "सर, तुमची पँट मागून फाटली आहे...!!!"

काय करु? प्रेम केलयं...

काय करू प्रेमात कुणाल विसरता येत नाही
काय करू प्रेमात कुणाल विसरता येत नाही
काय करू प्रेम केलय तिझ्यावर विसरताही येत नाही
विसरायला जाव तर मी स्वत:चाच उरत नाही
तिझ्याशी बोलाव म्हटलतर तिला तिझ्याघरातल्याच ­ा त्रास
न बोलता गप बसाव तर माझ्या जिवाला त्रास ...............
पण माझ्या जिवाच काय.....
त्याच्या भावना तर ती जाताच मेल्यात......
ती परत येईल या आशेवर जीव तेवढा टिकून राहिल्यात .....
माहित आहे ती येणार नाही पण .....
मी अशा मात्र सोडणारनाही ,.............. ­..कारण
प्रेमात कुणाल विसरता येत नाही........... ­............... ­..
कारण
प्रेमात कुणाल विसरता येत नाही........... ­.........

फक्त विसरु नकोस...

जा पुढे तु अशीच जा मागे वळुन पाहु नकोसतुझे आनी माझे गुपीतहोते ऊगडयावर
तु ते आनु नकोस भोगलेली सवपने अशी तु रंगवु नकोस निराशाची आशा करू नकोस
फुल नाही मनुन झाडाला दोष तु देऊ नकोस पन राजाची राणी हो पन माझी ओळख
विसरू नकोस

सवय अजुनही आहे...

तू निघून गेल्यावर तुझी वाट पाहण्याची,
सवय अजूनही आहे......
बदललोय मी आता असं म्हणतात सारे
विसरलोय तुला मी असंही म्हणतात सारे
पण श्वासागणिक तुझं नाव घेण्याची
सवय अजूनही आहे……!!!!
बदललाय मी माझा रस्ता
शोधल्यात आता नव्या वाटा
पण गेलोच तुझ्या घरासमोरून कधी
तर तुझ्या खिडकीकडे बघण्याची
सवय अजूनही आहे……!!!
रोज निरखतो बदलणारी चंद्रकोर
आजही वाटतो फिका,चंद्र तुझ्यासमोर
अशीच चंद्राशी तुझी तुलना करण्याची
सवय अजूनही आहे……!!!!
माझा आणि देवाचा तसा
छत्तीसचा आकडा आहे…
पण गेलोच देवळात कधीतर
तुझ्या त्या देवाकडे तुला मागण्याची
सवय अजूनही आहे……!!!
आताही जागतो मी रात्रभर
चांदण्यांनाही झोप नसते क्षणभर
मग आमच्या गप्पा रंगल्या की
चांदण्यांना तुझ्यागोष्टी सांगण्याची
सवय अजूनही आहे……!!!
एकटा-एकटा आता राहू लागलोय मी
दिवसाही तुझी स्वप्नं पाहू लागलोय मी
भंगली पूर्वीची स्वप्नं सारी तरीही
तुझ्या स्वप्नांत जगण्याची
सवय अजूनही आहे……!!!

श्वास

श्वास होता श्वासात तेव्हा,
नव्हत कोणी डोकावून बघायला,
आज जेव्हा श्वासच उरला नाही,
तेव्हा आले सगळे बघायला,
नव्हत कोणी रडायला माझ्याबरोबर,
तेव्हा, नव्हत कोणी हसायला,
आज जेव्हा शांतपणे झोपलोय मुक्त होऊन,
तर, आले सगळे टाहो फोडायला,
आज पहा माझा काय थाट!
लोक जमतील मला अंघोळघालायला,
आयुष्यभर नाही पाहिल कधी कापड,
आज नवीन पांढरे-शुभ्र वस्त्र मला नेसायला,
जेव्हा उपाशी होतो रात्रों-रात्र,
नव्हत कोणी एक घास खाऊ घालायला,
आज जेव्हा भुक मेली माझ्याच बरोबर माझी,
ठेवलाय माझ्यासाठी त्यांनी भात शिजायला,
जन्मभर लाथा मारून गेले जे मला,
आज आले माझ्या पाया पडायला,
शब्दाचाही आधार नाही दिला ज्यांनी,
आज चौघे-चौघे आले मला धरायला,
आज काय किम्मत 'त्या' रडण्याला?,
आज काय किम्मत 'त्या' छाताड झोडण्याला?,
ज्या घरात रहातच नाही आज कोणी,
आज काय किम्मत 'ती' घरपूजा करण्याला?

तुझ्या आयचा घो!

इंजिनियरींग झाल्यावर चंप्या इंटरव्ह्यु साठी जातो....... इंटरव्ह्यु सुरु झाल्यावर....... बॉस : सांग अशी कोणती गोष्ट आहे जिला २ चाकं आहेत ?? चंप्या : बाइक !!!!!! बॉस : चुक !!!!! होंडा बाइक !!!!!!! बॉस त्याला दुसरा प्रश्न विचारतो....... बॉस : बरं ते जाऊदे, आता सांग अशी कोणती गोष्ट आहेजिला ४ चाकं आहेत ?? चंप्या : कार !!!!!!! बॉस : परत चुक !!!!!!!! मारुती कार !!!!!! आता चंप्याची सटकली रे....... चंप्या बॉस ला सांगतो : परवानगी असेल तर मी एक प्रश्न विचारुशकतो का बॉस : ठीक ये !!!!! विचार, पण एकच विचार !!!! चंप्य : ठीक ये !!!!! मला एक सांगा नवऱ्याला कोकणात काय म्हणतात?? बॉस : घो !!!!!! . . . . चंप्या : नाही !!!! तुमच्या आईचा घो !!!!!! (बॉस कोमात 'इंजीनिअर' चंप्या जोमात)

10 सुखद क्षण

कॉलेज जीवनातील १० सुखद क्षण.... १) शेवटची परीक्षा.... २) सकाळी उठल्यानंतरची ५ मिनिट झोप ३) 'क्लास रद्द' झाल्याची बातमी सांगणारा मित्राचा/­मैत्रिणीचा फोन ४) नवीन मित्रांसोबतची कॅंटीन मधील पहिला चहा ५) एखाद्या जवळच्या मित्रासोबत/ ­­मैत्रीनिसोबत भांडण झालेले असते आणि तो/ती समोर दिसणे.... आणि मनातल्या मनात जुन्या आठवणी साचणे.... ६) रात्रीचा मुव्ही शो सूटल्यानंतर मित्रांसोबत रूम/हॉस्टेल वर धिंगाणा घालत जाणे.... ७) पावसात भिजत-भिजत मित्रांसोबत कॉलेज ला जाणे..... आणि कॅंटीन मध्ये जाऊन गरमा गरम भजी खाणे ८) एखादी मुलगी क्लास मध्ये येत असताना तिला एखाद्या मुलाच्या नावाने चिडवणे.... ९) मुलाने मुलीला मागितलेले पहिले जर्नल/ ­असाइनमेंट... १०) कॉलेज चा पहिला व शेवटचा दिवस ♥

तिला सहज विचारलं..

तिला सहज विचारलं माझ्यावाचून जगशील का..? ती म्हणाली माशाला विचार पाण्यावाचून राहशीलका...? हसून पुन्हा तिला विचारलं मला सोडून कधी जाशील का...? * * ती म्हणाली कळीला विचार देठा वाचून फुलशील का..? ... गंमत म्हणून तिला विचारलंतू माझ्यावरखरच प्रेम करतेस का...? ती म्हणाली, पाणावलेल्या डोळ्यांनी, नदीला विचार ती उगाच सागराकडे धावते का??

Sunday, December 16, 2012

मुलाचे डोळे आणि मुलीचे हृदय

" मुलाचे डोळे हे गुगल पेक्षा जास्त वेगाने गर्दीतल्या सुंदर मुलीला शोधून काढतात ...... पण, त्याच मुलाचे हृदय हे सरकारच्या कामकाजा पेक्षाही ­ संथ गतीने तिला प्रपोज करण्यास वेळ लावते "

सोडून जाऊ नकोस...

आयुष्यभर हसवेन तुला, पण मला कधीही रडवून जाऊ नकोस,,,,,,,,,,, ­, काळजी घेईन तुझी जीवापाड पण मला वाऱ्यावर सोडून जाऊ नकोस,,,,,,,,,,, ­,, शेवटच्या श्वासापर्यंत साथ देईन तुझी पण मला अर्ध्यात सोडून जाऊ नकोस,,,,,,,,,,, ­, तुझ्यासाठी आयुष्य देऊन टाकेन पण मरण्या अगोदर मरण देऊन जाऊ नकोस मला,,,,,,,,,,,, ­,,,,,

तुला कधी कळणार?

न बोललेल्या शब्दातला अर्थ तुला कधी कळणार? अबोल डोळ्यातले भाव तुला कधी दिसणार? तू समोर आल्यावर माझघाबरण, लाजण, घाबरून मन खाली घालण. तुझ्याशी बोलताना माझा अडखळण याच्यातला अर्थ तुला कधी समजणार? शब्दांच्या साक्षीने एक सत्य सांगतेय मी मनोमन तुझ्यावर प्रेम करतेय माझ्या मनातल प्रेम तुला कधी कळणार? मी तर बोलले आता तू कधी बोलणार?

प्रेम कधी हरलं नाही


Saturday, December 15, 2012

मेहंदी तुझ्या हातावरची....


खरचं मुलं असतातच असे

खरच काही मुले असतातच असे . . एखाद्या मुलीवर मनापासून प्रेम करणारे, ती आपली होऊ शकत नाही हे माहीत असून फ़क्त तिच्यावरच प्रेम करणारे . . मुले असतातच असे . . तिचे सर्व हट्ट पुरवणारे, फक्त तिला सुखात पाहण्यासाठी सतत निस्वार्थी प्रयत्नात असणारे . . मुले असतातच असे,. स्वतः खोडी काढणारे, पण ती रागावली आहे हे पाहून तिला पुन्हा आनंदाश्रूंत भिजवणारे . . खरच काही मुले असतातच असे . . माझ्या सारखे... हरवलेल्या गर्दित देखील स्वताला विसरून त्यात आपले प्रेम शोधणारे. .

Thursday, November 8, 2012

सोनपरी

वाटल नव्हत कधी असही कधी घडेल.....! एक गोड सोनपरी माझ्या प्रेमात पडेल.... इटुकल्या - पिटुकल्या मेसेज मधून मला वाकुल्या दाखवेल..... हळूच एखादा MISS CALL करून मला ती सतावेल..... वाटल नव्हत कधी असहीकधी घडेल.....! स्वप्नामध्ये माझ्याहळूच कोणीतरीशिरेल..... बोलायला"काहीच नाही"म्हणून फोनवर तासभर बोलेल.... आणि नेमक महत्वाच बोलताना फोन ठेवण्याची घाई करेल..... वाटल नव्हत कधी असहीकधी घडेल.....! माझ्याही आठवणीत रात्रभर कोणीतरी जागेल..... तिच्या विरहाचे चार दिवस चार जन्माचे अंतर दाखवेल..... आणि तास-दोन तासांचीभेट सुद्धा क्षणभर वाटेल..... वाटल नव्हत कधी असहीकधी घडेल....! या एकाकी जीवनामध्ये त्या परीचा प्रेमाचा स्पर्श लाभेल...... वाटल नव्हत कधी असहीकधी घडेल.....! एक गोड सोनपरी माझ्या प्रेमात पडेल....

मुले असतातच असे

मुले .........असतातच असे.... एखाद्या मुलीवर मनापासून प्रेम करणारे, ती आपली होऊ शकत नाही हे माहीत असून फ़क्त तिच्यावरच प्रेम करणारे... - मुले .........असतातच असे.... तिचे सर्व हट्ट पुरवणारे, फक्त तिला सुखात पाहण्यासाठी सतत निस्वार्थी प्रयत्नात असणारे... - मुले .........असतातच असे.... स्वतः खोडी काढणारे, पण ती रागावली आहे हे पाहून तिला पुन्हा आनंदाश्रूंतभिजवणारे... - खरच काही मुले.........असतातच असे .... माझ्या सारखे... हरवलेल्या गर्दित देखील स्वताला विसरून त्यात आपले प्रेम शोधणारे.......! !!

प्रेम फसवे असते

तु माझी, मी तुझा, सांगायला बरे वाटते, लोकांना तुझे माझे नाते प्रेम वाटते, सांगुन थकलो त्यांना की दिसते तसे नसते... म्हणुन तर म्हणतो - प्रेम फसवे असते .