Sunday, January 20, 2013

शिवार हे फुललं सारं हिरवं झालं रान....

 काळ्या काळ्या मातीमधी पिकलंया सोनं
शिवार हे फुललं सारं हिरवं झालं रान ||धृ||

औंदाच्याला बरसला बरसला पानी
मातीचा सुवास आला गर्द हिरव्या रानी
पळापळी करतात खोंडं माजेल ओलं वारं पिऊन
शिवार हे फुललं सारं हिरवं झालं रान ||१||

विहीरीच्या पान्यामंदी चाले मोटर तासंतास
पाटामधून पानी जाई खालच्या शेतास
वखरणी करतात बैलं वैरण खावून
शिवार हे फुललं सारं हिरवं झालं रान ||२||

डोईवर पदर हिरवी साडी लेवून
कारभारणी येईल आता न्याहारी घेवून
घाम गाळून कामं करतो हाती येवूदे धन
शिवार हे फुललं सारं हिरवं झालं रान ||३||

शेतकरी बळीराजा झाला पोरगा धरतीला
अन्नधान्य पिकवून देई आधार देशाला
कणगीत धान्य भरू दे देवा नको काढाया ऋण
शिवार हे फुललं सारं हिरवं झालं रान ||४||

             

Saturday, January 19, 2013

एक रोप...प्रेमाचं...Sad-Love-Story

माझा एक मित्र आहे. कॉलेजमध्ये सर्व जण करतात तसे त्यानंही बरेच उद्योग
केले. पोरींना भरपूर त्रासदिला. सरांची नक्कल केली. कॅंटीनचे पैसे
बुडवले. "फर्स्ट डे फर्स्ट शो' पाहिले. दरमहिन्याला त्याच्या अंगावर नवा
शर्ट असायचा. तो नेहमी म्हणायचा. "जन्माला आलोय तर फुल्ल ऐष करणार,
प्रेमाबिमात नाही पडणार' त्यानं त्याच्या बाईकरवही"आय हेट गर्ल्स' असंच
लिहिलं होतं. आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा. त्यामुळं लाडातच मोठा झालेला.
शिवाय त्याच्या सोसायटीत भरपूर मुली. त्यामुळे मुलींचं त्याला तसं काही
सोयरसुतक नव्हतंच. पोरींशी बिनधास्त बोलायचा. अभ्यासात हुशार नव्हता; पण
खेळाची कमालीची आवड होती त्याला. कायम खिदळत असायचा. पण... पण आज
त्याच्या चेह -या वरचं हसू कुठल्या कुठं पळून गेलंय. तो एका मुलीच्या
प्रेमात पडला होता. गोरीपान आणि देखणी मुलगी होती ती. कसलाही विचार न
करता त्यानं तिला बिनधास्त प्रपोज केलं होतं. ती होस्टेलला राहायला होती.
सहा महिने तो तिच्या मागं लागला होता.
खरं प्रेम केलं होतं त्यानं. त्यामुळं त्या मुलीनंही होकारदिला. त्याचा
स्वभाव निर्मळ होता. पण तो आई-बाबांना खूप घाबरायचा. लाडात वाढला असला,
तरी त्याच्यावर आई-बाबांचा धाक होता.त्यामुळं त्यानं प्रेमाविषयी त्यांना
काही सांगितलं नव्हतं. त्याची हिंमतच होत नव्हती.
तो तिच्यासोबत नेहमीखडकवासल्याला फिरायला जायचा. खडकवासल्याच्या पुढे
पानशेत रस्त्याशेजारी एका ठिकाणी ते गप्पा मारत बसायचे. एकदा ते असेच
फिरायला निघालेतेव्हा त्याच्या प्रेयसीनं एका कॅरीबॅगमध्ये छोटंसं रोपटं
घेतलं होतं. आपण बसतो ना, तिथं मी हे रोप लावणार, अशी तिची कल्पना ऐकून
तो पोट धरून हसला होता. त्याच्या हसण्यानं ती रुसूनही बसली होती. कसंबसं
तिचा रुसवा घालवत दोघं त्या ठिकाणी गेले. दोघांनी तिथं रोपटं लावलं. सोबत
पाण्याची बाटली होती. त्या रोपट्याला पाणीही घातलं. आठवड्यात एकदा तरी
त्यांची तिथं चक्कर व्हायचीच. दर वेळी ते दोघं त्या रोपट्याशेजारी गप्पा
मारत बसायचे.
एके दिवशी ती गावी निघाली. तो आईसोबत मावशीकडे गेला होता. त्यामुळं त्या
दोघांना भेटता आलं नाही. शिवाय ती दोन दिवसांनी परत येणार होतीच.
त्यामुळं नको येऊ भेटायला, असं तिनंच सांगितलं होतं. घरी पोचल्यावर फोन
कर असं सांगून त्यानं फोन ठेवला. तिचा फोन आला नाही, म्हणून त्यानं फोन
केला; पण कुणीच उचललानाही. घरी गेल्यानं मला विसरली वाटतं, असा राग मनात
धरून त्यानंही परत तिला फोन केला नाही. दुर्दैवानं दुस-या दिवशी मला
समजलं, तिचा अपघातात मृत्यूझाल्याचं. त्याला ही बातमी कशी सांगायची तेच
सुचत नव्हतं. खूप धाडस करून मी त्याला सांगितलं. हळव्या मनाचा होता तो.
जागेवरच खाली बसला अन्‌ मोठमोठ्यानं रडायला लागला. आवरणार तरी कसं
त्याला? माझ्या गळ्यात पडून रडू लागला. क्षणाचाही विचार न करता त्यानं
गाडी काढली. मला पाठीमागं बसवलं अन्‌आम्ही तिच्या गावाकडं गेलो; पण काही
उपयोग नाही. सर्व काही उरकलेलं होतं. तिथं त्यानं स्वत:ला सावरलं. तो
तिथं रडला असता, तर तिथल्या लोकांना संशय आला असता. आम्ही तिच्या बाबांना
भेटलो अन्‌ अर्ध्या तासात माघारी फिरलो.
मला वाटलं, आम्ही घरीयेतोय. पण आमची गाडी खडकवासल्याकडं निघाली होती. मी
काही बोललो नाही. पानशेत रस्त्याशेजारी त्यानं गाडी थांबवलीअन्‌ एका
झाडाला पकडून तो मोठ्यानं रडू लागला. त्यानंतर दररोज तो तिथं जात होता
अन्‌ झाडापाशी बसून मुसूमुसू रडत होता. आठ महिन्यांपूर्वी त्याच्यावर
दु:खाचा डोंगर कोसळला होता. पण आता तो हळूहळू सावरतोय. आता त्याचा
स्वभावही बदलला आहे. एखाद्या शांत मुलाप्रमाणं तो वागतोय.
त्याच्या आई-बाबांनायाविषयी काहीच माहिती नाही. तो घरात काही बोलतही
नाही. फक्त रात्रीच्या वेळी तिनं त्याला दिलेली लेटर वाचतो. तिनं दिलेलं
गुलाबाचं फूल आता सुकलंय. ते एकटक बघतो अन्‌ उशीत तोंड खुपसून रडतो. तो
म्हणतो, ""ते झाडच आतामाझं सर्वस्व आहे. त्या झाडाच्या पानाफुलांत मी
तिला शोधतो. लोक झाडावर प्रेम करा असं म्हणतात;पण मी प्रेम करणाऱ्या
प्रत्येकाला सांगीन,की तुम्हीही असं एखादं रोपटं लावा. तुमची "लव्ह
स्टोरी' माझ्यासारखी अर्धवट राहणार नाही. खरं प्रेम असेल, तर ही
निःस्वार्थी रोपं खूप काही देतात. मी स्वत: हे अनुभवतोय.''

Tuesday, January 15, 2013

आईची ममता.!

खंर प्रेम काय असत :
मे महिन्याच्या गर्मी मध्ये जेह्वा मुलगा
आपला घाम प्रेयसीच्या दुपट्ट्याने पुसतो
तेह्वा ती बोलते दुपट्टा घाण करू नकोस,
.
... .
आणि तोच मुलगा जेह्वा आईच्या पदराने घाम पुसतो
तेव्हा आई बोलते
.
.
.
.
बेटा पदर घाण आहे स्वच्च करून देते हा!!♥
मुलाच्या डोळ्यात पाणी येत !!!
LiKE n share *** if u loveur आई !♥!

Sunday, January 13, 2013

तिल गुड घ्या अन् गोड गोड बोला . . . संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा . ..

आली मकर संक्राती
नांदी नव्या युगाची

चला राहू नका मागे
चला या रे सारे आगे
संक्रमण करु या
मकराचा सूर्य सांगे

चला झटका जुन्याला
चला कवळा नव्याला
बदलत्या युगासंगे
करा Remix सारे

चला उडवा पतंग
चला उठवा तरंग
दोर हिंमतीचा
उंच जाऊ द्या रे

चला सोडा भांडण तंटे
चला फोडा द्वेषाचे भांडे गोड तिळगुळ घ्या
बोला बोल प्रेमाचे
घ्या,गोड तिळगुळ घ्या
बोला बोल प्रेमाचे...

तिल गुड घ्या अन् गोड गोड बोला . . .
संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा . ..

स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी

सांग मला रे सांग मला
आई आणखी बाबा यातुन,
कोण आवडे अधिक तुला ?

आई दिसते गोजिरवाणी,
आई गाते सुंदर गाणी,
तऱ्हेतऱ्हेचे खाऊ येती,
बनवायाला सहज तिला !
आई आवडे मला.

गोजिरवाणी दिसते आई, शक्तिवान किती असती बाबा..
थप्पड देती गुरख्याला !
आवडती रे वडिल मला !
घरात करते खाऊ आई,
घरातल्याला गंमत नाही
चिंगम अन्‌ चॉकलेट तर,
बाबा घेती रस्त्याला !
आवडती रे वडिल मला !
कुशीत घेता रात्री आई,
थंडी-वारा लागत नाही
मऊ सायीचे हात आईचे,
सुगंध तिचिया पाप्याला !
आई आवडे मला.

दादा कोँडके रॉक्स!

एकदा एक माणुस दादा कोंडकेंना विचारतो, . दादा तुम्ही चड्डी कुठे शिवता?? . दादा कोंडके म्हणतात, . . . . च्यायला कुठे म्हणजे काय जिथे फाटली तिथे... ;) :P :D खी खी खी :P

एक कथा ओर्कुट ची...

एक कथा ओर्कुटवरची

यश अरे चल उठ, किती वाजलेत बघ, ऑफिसला जायचा नाही आहे का? आईच्या या ओरडण्याने यश ला जग आली, रात्री मित्राबरोबर पार्टीला गेला असल्याकारणाने घरी यायला थोडा उशीरच झाला आणि त्यामुळे झोपायलाही. रात्री तशी जरा जास्तच झाली होती म्हणून आता त्याच डोकही ठणकत होतं पण ऑफिसला जाण भाग होतं सिंगापूर वरून कंपनीचे md यायचे होते. यश कसाबसा उटला त्याने आपली सर्व कामं पटापट आटपली. आईने दिलेला चहा व नाश्ता करून आईने दिलेला डबा घेवून तो ऑफिसला निघाला, ऑफिस घराच्या २० मिनिटावरच असल्याकारणाने त्याला ट्रेन व बस च्या प्रवासाचा त्रास नव्हता. चालतच तो ऑफिसमध्ये पोहचत असे, आज हि md यायच्या आधी त्याला सर्व काम आठपायची होती. यश एका केमिकॅल कंपनी मध्ये IT Manger होता. ऑफिसची मेन ब्रान्च सिंगापूर ला होती, रोह्याला कंपनीच production चालायचं, ऑफिसमध्ये पोहचल्यावर सर्वात आधी त्याने email चेक केले कामाचे काही mail त्याने वाचून झाल्यानंतर त्याची नजर मानसीच्या मेल वर पडली, नेहमीप्रमाणे ते न वाचता त्याने ते फोल्डर मध्ये ट्रान्स्फर केलं, नंतर वाचू सावकाश असा मनातल्या मनात तो बोललाही. डोक आतून तसं मध्ये मध्ये ठणकतच होतं पण चेहऱ्यावर त्याचा मागमूस आणून चालणार नव्हतं कामावर परिणाम झाला तर एकंदरीत त्याच्या करिअरवर परिणाम होवू शकला असता.
यश एका मध्यमवर्गीय घरातला मुलगा, मुंबईच्या गिरणगावात लहानाचा मोठा झालेला. आई, वडील, मोठा भाऊ आणि यश असं त्याचा चौकोनी कुटुंब. यश चा आपल्या घरातल्यावर प्रचंड प्रेम आणि विश्वास, त्यांच्या व्यतिरिक्त तो इतरांना जुमानत नसे. मोठा भाऊ प्रीतम एका insurance कंपनी मध्ये accountant होता. वडील गिरणी कामगार होते, एका कपड्याच्या मिलमध्ये ते supervisor होते, तुटपुंजा पगार त्यात गिरण्याचा संप होवून मिल बंद पडलेली, त्यांनी मग मिळेल ती नोकरी करत मुलांना उच्च शिक्षण देवून त्यांना त्यांच्या पायावर उभं करण्यात त्याचं उभं आयुष्य वेचलं, त्यांना यश च्या आईने हि खंबीर पणे साथ दिली, आपल्या वडिलाच्या कष्टाची जाणीव दोघांना हि होती म्हणूनच मग दोघेही कमावते झाल्यावर त्यांनी वडिलांना सक्तीची विश्रांती घायला लावली, यशच्या नातेवाईकाचा गोतावळा खूप मोठा होता, काका मावश्या सर्व चांगल्या सुखवस्तू कुटुंबातले वावरणारे पण यशच्या वडिलांनी आपल्या पडत्या काळातही कोण नातेवाईकाची मदत नाही घेतली, आपल्याला जमेल तसं ते आपल्या परीने करत राहिले.
यश राहत असलेल्या चाळीतल्या वातावरणाची त्याला भारी आवड, आपल्या गावच्या घराबद्दल, गावच्या मातीचही त्याला प्रचंड आकर्षण, त्याला जमेल तसं सुट्टीत तो एकटाच कोकणात जावून यायचा, दोन दिवस निसर्गाच्या सानिध्यात राहिल्यावर जगण्याची नवी उर्मी त्याला येई, यशला फिरण्याची हि प्रंचड हौस, शनिवार, रविवार चे त्याचे आणि त्याच्या मित्रांचे पिकनिक चे प्लान आधीच ठरलेले असायचे, पिकनिक ला गेला कि ओघाने पिणं हे व्हायचंच. बीअर ची पहिली चव यशने कॉलेजमध्ये असताना चाखली, मित्रांना नाही बोलणं म्हणजे आपण खूप shy आहोत असं दाखवणं, कॉलेजमध्ये चालू झालेलं ड्रिंक घेणं अजूनही मध्ये मध्ये चालूच होतं, कधी मित्रांसोबत पार्टीला, कधी सहज मित्र एकत्र भेटले कि, कधी कोणाच्या बर्थडे ला, पण कधी त्यांचा अतिरेक झाला नाही. कधी तरी लहर आलीच तर तो घरी आणून हि पीत असे हो पण आईबाबा घरी नसताना.
md आल्यामुळे यश प्रचंड कामात होता, आज त्याला mobile उचलायला हि वेळ नव्हता, mobile मुळे उघाच disturb व्हायला नको म्हणून तो त्याने silent वरच टेवला होता, त्यांचा तो दिवस प्रंचड धावपळीचा आणि कामाचा गेला, रात्री १० वाजता त्याचं काम आटपल. md बरोबरची मीटिंग संपवून, पुढील कामाचं स्वरूप समजावून घेवून रात्री १०.३० वाजता त्याने घर गाटल, घरी आल्यावर त्याने mobile पहिला मानसीचे १० मिस कॅल त्यात होते, अजून एक दोन मित्र मैत्रिणीचे मिस कॅल हि होते. आता कोणालाही फोन करायची ताकत त्याच्यात नव्हती कधी एकदा अंथरुणाला अंग टेकतोय असं त्याला झाला होतं. मानसीने एवढे मिस कॅल का केले असतील हा विचार एकदाही त्याच्या मनात आला नाही.
काही जणाशी क्षणार्धात मैत्री होते, तर कधी वर्षानुवर्षची ओळख असेल तरी अनोळखीच राहतात. 
यश : हाय 
मानसी : कुठे गायब zalas 

यश: अरे जरा काम करत होतो
मानसी : काय बोलतोस? घरी येवून काम?
यश: हो...
मानसी : कसलं
यश: काही नाही नेहमीची काम
मानसी : तरी पण कसली 
यश : अरे घरातली काम करतोय
मानसी : नीट काम कर 
यश : हो ग तू tension घेवू नकोस
मानसी : हो नाहीतर एकाचे दोन करशील....
चल निघतेय उद्या बोलू..
यश: चालेल
अरे अजून गेली नाहीस?
मानसी: तू येतोयस का वाट बघतेय
yash : कुठे ते sang
मानसी : स्वप्नात
यश : नक्की येतो, उद्या मला सांग भेटलो का ते?
मानसी : नक्की, चल bye 
यश : स्वीट ड्रीम मी नक्की भेटेन
दुसऱ्या दिवशी 

यश : खूप कामात आहेस का
मानसी: चालू आहेत काम.. तू बोल
यश : मग आलो होतो कि नाही काल स्वप्नात?
मानसी: नाही ना
यश : so sad
मानसी : बहुतेक दुसऱ्या कुणाच्या तरी गेला असशील..
यश : असू शकेल
मानसी : मग कुठपर्यंत आला होतास दादर कि बांद्रा?
यश : कधी
मानसी : स्वप्नात रे....
यश: त्याला काही मर्यादा नाहीत ग....
मानसी : म्हणजे हळू हळू पुढे येशील ना 
यश : नक्की येईन 
असं हळू हळू दोघाच बोलणं चालू झालं. दोघं एकमेकाशी बोलताना खूप बोलायचे, आज मानसीला खूप वैताग आला होता, यश शी बोलताना पण ती मनापासून बोलत नव्हती 
यश : आज मूड दिसत नाही आहे बोलायचा
मानसी : कंटाळा आलाय 
यश : कोणाचा माझा का?
मानसी : मी असं बोलले का? तुला आलाय का माझा कंटाळा ?
यश : तू वैतागतेस का कधी मित्रा वर
मानसी : नाही
यश : मग मित्रावर कोणी वैतागते का? तुला कधी असं वाटलं का मी तुझ्याशी मैत्री फक्त फायद्या साठी केली?
मानसी : नाही
यश : इतका तरी विश्वास आहे ना, १ महिन्यात एवढा तरी विश्वास संपादन करू शकलो विश्वास असेल तरच कुठचं हि नातं टिकते, जिथे विश्वास नसेल तिथे कोणतंच नातं टिकत नाही
मानसी : मी फक्त मैत्री करते....
यश : कधी निघणार आहेस?
मानसी : का तू येतोयस का सोडायला?
यश: खरच येऊ? कुठे येऊ ते सांग?
मानसी : तुला जायचं असेल भटकायला 
यश : तू येतेस का?
मानसी कुठे
यश : भटकायला जावूया..
मानसी : कुठे?
यश : तू सांगशील तिथे जावूयात 
मानसी : थांब तुझ्या आईलाच सांगते, मुलीना फिरायला बोलावतो म्हणून
यश : सांग बिनदास्त, आपण असं किती दिवस chat वरच बोलणार, आता तरी mobile नंबर दे, म्हणजे आपल्याला एकमेकाशी फोनवर बोलता येईल.
मानसी : अरे इथेच बोलायला वैतागतोस, मग अजून कंटाळशील.
यश ; तुझ्याशी बोलायला कधीच कंटाळा नाही येत.
मानसी : बऱ
..........................................................................................................................................................................................पूर्ण दिवस भर बोलून हि यश संध्याकाळी घरी आला कि आधी pc ओपन करून बसायचा मानसी शी बोलण्यासाठी, बघता बघता त्याच्या ओळखीला १ महिना झाला. एक महिन्यानंतर दोघांनी एकमेकाचे फोन नंबर एकमेकांना दिले, आता एकमेकाशी बोलणं जास्त सुकर होईल, नंबर भेटल्यावर पहिला फोन मानसी नेच केला, समोरच्याचा आवाज कसा असेल, त्याचा बोलणं कसं असेल, आपल्याशी खरं बोलत असेल कि नुसताच timepass करत असेल असे अनेक प्रश्न मनात घेवून तिने त्याला फोन लावला होता, त्यावेळी यश मित्रांबरोबर असल्याकारणाने आपण नंतर फोन करतो असं सांगून फोन ठेवून दिला, पण त्यानंतर यश ने स्वतःहूनच फोन केला, chat वर जितके बोलायचे तेवड्याच आत्मीयतेने दोघं फोन वर बोलले, दिवसे दिवस त्याची मैत्री घट्ट होत चालली होती, यश च्या रूपाने मानसीला एक छान मित्र भेटला होता, हळू हळू ती यश शी सर्व गोष्टी शेअर करायला लागली, काही शी सूर पटकन जुळतात, दिवसभरात काय काय घडलं हे सर्व तिला यश ला सांगायचं असायचं, यश आपला सर्व बोलणं ऐकून गेतो याचंच तिला खूप अप्रूप होतं, यश हि तसं शेअर करायचा पण फारच कमी गोष्टी, घराबद्दल शक्यतो जास्त बोलणं तो टाळायचा, घरातल्या शिवाय आपला इतर कोणावरही विश्वास आणि प्रेम नाही असं ठामपणे बोलायचा.यश न चुकता दररोज एक तरी फोन करायचाच, कधी कधी ४-५ वेळा हि, sms ची देवाण घेवाण व्हायची ती वेगळीच..

मानसी : काजू कतरी खायला ये,
यश: काजू कतरी कशाबद्दल, माझ्या वाटणीची पण तूच खा
मानसी : अरे office मध्ये वाटली, एकच आहे.
यश : एकच काजू कतरी आहे आणि ती खायला बोलावतेस 
मानसी : मग काय, प्रेम हे देण्याने वाढते.
यश : मग दे ना
मानसी : आता संपली
यश : मी प्रेमाचा भुकेला आहे.
मानसी : म्हणून सांगते tv वरच्या जोडी जमली रे मध्ये जा
यश : अरे तिथे पण खरं प्रेम भेटेल याची शाश्वती नाही ना
मानसी : भेटेल रे
यश : पण कधी, कारण अजून पर्यंत माझ्यावर कोणीच प्रेम केला नाही ना... तुझ्या शिवाय मला आता पर्यंत कोणीच सांगितलं नाही कि मी हंड्सम, सुंदर, फोटोजनिक, आणि मन मिळाऊ आहे ते.
मानसी : अरे रे, सांगायला हवं होतं ना कोणी तरी,
यश : मी नेट वर लावलेला फोटो कसा आहे?
मानसी : मस्त 
यश : खरच मस्त कि ऊगाच सांगतेस
मानसी : तुझा कधी माझ्यावर विश्वास बसतो
यश : नेहमीच, जा आता घरी, tension घेवू नकोस
mansi : कोणाचं तुझं का?
यश : अरे वाह माझं tension आहे का तुला?
मानसी : म्हणजे काय?
असं त्याचं बोलणं हळू हळू वाढत होतं.

दोघाच्या मैत्रीला आता जवळ जवळ ६ महिने होत आले होते, दररोज किमान एक तास तरी फोनवर बोलणं व्हायचंच. कधी कधी दोघंही कॉलेजच्या आठवणीत रमून जायचे, यश कॉलेज LIFE विषयी खूप बोलायचा. तेव्हाच कॉलेज, आताच बदललेलं त्याच रूप, आपण केलेली कॉलेज मधील मजा, एकाच कॉलेज मध्ये असून कधीही एकमेकांना न बघणे, LECTURE बंक करून कॅम्पस मध्ये केलेल्या मजेविषयी यश भरभरून बोलायचा.मानसीच्या वाट्याला तशी इतरांसारखी मजा आलीच नाही, वडील लवकर गेल्यामुळे घरातली मोठी मुलगी असल्याकारणाने घराचा सर्व भार तिच्यावरच आला. ती दहावीत असतानाच तिचे वडील गेले, भाऊ लहान, कमाईच काहीच साधन नाही, वडील खाजगी कंपनी मध्ये नोकरीला. आई ने थोडे थोडे साठवलेले पैसे यावेळी कामी आले, वडिलांची ग्राज्युती आणि PROVIDEND FUND चे काही पैसे भेटले, ते बँकेत टाकून त्याच्या वरच त्याची गुजराण चालू झाली, मानसीचे वडील तसे कमी बोलणारे, संसार विषयी त्याची फारशी असता नव्हती. घरातल्यांनी सांगितलं म्हणून त्यांनी लग्न केलं. संसारात त्यांना कधी अडकायचं नव्हतं. त्यामुळे मुलांवरही त्यांनी कधी प्रेम केलं नाही कि त्यांना कधी प्रेमाने जवळ घेतलं नाही,कि त्यचे कधी लाड हि केले नाहीत, काविळीच निम्मित होवून ते गेले. आपल्यावर आलेल्या परिस्थीची जाणीव मानसीला होती, त्यामुळे आईला ती हर प्रकारे मदत करत होती, तशी ती मुळातच हुशार असल्याकारणाने, शाळा, कॉलेज च्या शिक्षणासाठी TRUSTI ची मदत तिला भेटली, वह्या पुस्तकाचा खर्च त्याच्याच तर्फे होत असे, तिने TUTION घ्यायला सुरुवात केले होती, त्यातून थोडी फार मिळकत होत असे, तिने काही घरी करायची कामहि आणली, जस टिकल्या बनवणं, कपड्याचे धागे काढणे. तिचा भाऊ तिच्या पेक्षा पाच वर्षांनी लहान असल्याकारणाने त्याच्याकडून हि काही अपेक्षा टेवू शकत नव्हती, त्यातल्या त्यात या गोष्टीच समाधान होत कि राहायला स्वतःच घर होत. मानसी तशी पहिल्यापासूनच कमनशिबी इतरांसारख्या सुखसोयी तिच्या वाट्याला कधी आल्याच नाहीत. साधं कोणाचं प्रेम हि तिच्या नशिबात नव्हतं. आई सतत काळजीत असायची, तिचं जास्त प्रेम भावालाच मिळायचं. मानसीने तश्या जास्त मित्रमैत्रिणी जमवल्याच नव्हत्या
तिला तेवढा वेळ हि नव्हता. शाळा कॉलेज मध्ये जेवढे ओळखीचे होते तेव्हढेच. तिने जिद्धीने आपलं शिक्षण पूर्ण केलं. बारावीनंतर part -time जोब केला, tution घेतले, रात्रदिवस अभ्यास करून MBA ची डिग्री घेऊन ती आज चांगल्या हुद्द्यावर होती, तिच्या कष्टाचं चीज झालं होत. जीवनात ती बरंच काही शिकली होती, बरेच चढउतार तिने पहिले होते, एखादं सुख आपल्या नशिबात आहे यावरच तिचा विश्वास नव्हता. भावाने चांगले शिक्षण घेऊन आपल्या पायावर उभं राहून आईची सेवा करावी, एवढीच तिची इच्छा होती. त्यामुळे तिच्या साठी यशची मैत्री वटवृक्षाच्या सावलीपेक्षा कमी नव्हती, अशी निरपेक्ष मैत्री ती पहिल्यांदाच अनुभवत होती, यश तिच्याशी कधीच फालतू बोलला नाही व बऱ्याच जणांना अशी सवय असते कि नेटवर मैत्री करायची आणि timepass साठी काही हि बोलायचं. पण यश आतापर्यंत तरी असं वागला नव्हता. कदाचित अजून दोघं एकमेकांना भेटले नव्हते म्हणून हि असेल कदाचित. दिवसभरात यश ला ऑफिसमधून फोन करणं जमलं नाही तरी तो संध्याकाळी ऑफिस नंतर mobile वरून बोलायचाच.

फोनवर-नेटवर खूप बोललो आता एकदा तरी भेटूयात,यश खूप मागे लागला होता मानसीच्या, कारण मानसी कशी दिसते, आपण जिच्याशी इतके मोकळेपणाने बोलतो ती कशी असेल, याची त्याला खूप उत्सुकता होती, हो नाही करत मानसी भेटायला तयार झाली. एका संध्याकाळी दोघांनीही marin -drive ला भेटायचं ठरवलं आपल्याला भेटून यश ची काय प्रतिक्रिया असेल, तो काय बोलेल, भेटल्यानंतर हि तो आपल्याशी मैत्री चालूच ठेवेल का? त्याने मैत्री तोडली तर? काही गोष्टीचं सुख अज्ञानात असते. आपण एकमेकांना भेटलो नाही तर इतकी छान मैत्री आहे. आपल्याला भेटून कदाचित.... असे बरेच प्रश्न मानसी ला पडले होते.मानसी तशी खूप सुंदर या प्रकारात येत नव्हती, चारचोघीसारखीच, नटणं-मुरडणं तिला जमत नसे पण दहा जणात उटून दिसणारी, अखेर त्याच्या भेटीचा दिवस उजाडलाच.
यश चा फोटो तिने पहिला असल्याकारणाने ती त्याला ओळखू शकत होती, इतक बोलण्यानंतर ते आज प्रयतक्ष भेटत होते mobile मुळे एकमेकांना ओळखणं सहज सोपं झालं होतं, बोलता बोलताच ते एकमेका समोर आले होते. यश तसा छान होता पटकन नजरेत भरणारा, त्याच ते भारदस्त व्यक्तिमत्व मानसी ला आवडून गेलं. यश ला आईस्क्रीम आणि choclate खूप आवडायचे म्हणून मानसी न विसरता त्याच्यासाठी cadboury घेऊन आली होती त्याचबरोबर तिने त्याच्यासाठी एक सुंदरस voilate हि घेतलं होतं त्यांच्या पहिल्या भेटीची आठवण म्हणून. यश ने मात्र मानसी साठी काहीच आणलं नव्हतं. त्याने तसं बोलूनही दाखवले. पण मानसी ने चालते रे करून जास्त मनावर घेतलं नाही. फोनवर, चाटवर, समस वर जरी ते एकमेकाशी खूप बोलत असले तर प्रत्यक्षात समोरासमोर भेटल्यावर मात्र काय बोलायचं हा दोघांना हि सुचत नव्हतं. तू बोल मी ऐकते/ऐकतो असाच बोलत त्याची ती संध्याकाळ संपली. timepass साठी त्यांनी यश च्या आवडीच आईस्क्रीम हि खाल्लं. मरीन-drive च्या queen neckles च्या साक्षीने दोघांनी एकमेकाचा निरोप घेतला.यश चा मित्र मैत्रिणीचा गोतावळा खूप होता, प्रत्येक शनिवार रविवार त्याचा मित्रमैत्रिणी मधेच जात असे. त्याच्याबरोबर पिकनिक, पार्ट्या चालूच असायच्या, मित्रांमध्ये तो खूप रममाण व्हयाचा. त्यामुळे मानसीला भेटण्यात त्याला काही वेगळेपण जाणवलं नाही. मानसीला मात्र नेटवर ओळख होवून आपण त्याला भेटलो हि याच गोष्टीचं अप्रूप वाटत होतं. मानसीला भेटल्यानंतर पुढचे चार-पाच दिवस यश ने फोनच केला नाही कि तो चाट वर हि आला नाही. मानसी ने फोन केला पण यश ने तिचा फोन केला पण यश ने तिचा फोन उचललाच नाही. मानसीला खूप काळजी वाटायला लागली याची तब्येत तर बरी आहे ना, काही बंरवाईट तर झालं नसेल ना, एक ना दोन हजार प्रश्न, का भेटल्या नंतर आपल्याला बघून पुढे मैत्री ठेवावीशी वाटत नाही याला, तिने तसा समस हि केला त्याला पण त्यावर असे काही नाही मी थोडा buzy होतो म्हणून फोन नाही करता आला, मला सर्व मित्रमैत्रिणी सारखेच असं उत्तर यश ने दिलं, मानसीने त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवला.
नंतर यश online कमी बोलायला लागला पण दर दोन दिवसांनी त्याचा फोन मात्र येत होतं. गणपतीत यश गावी जाणार होतं, गावच्या गणपतीला तो दरवर्षी न चुकता जात असे. गणपतीची मूर्ती आणणे, त्याची आरास करणे, सर्व यशच्या उपस्थितीतच पार पडत असे. यावर्षी हि तो जाणार होता, चांगली १० दिवसाची सुट्टी घेऊन. मुंबईतल्या गणपतीचं त्याला फारसं आकर्षण नव्हत.
यश ने गावी जातोय असं सांगितल्यावर मानसीला देवाला प्रसाद द्याची उर्मी दाटून आलीये, तिने तास यश ला विचारला हि सुरुवातीला हो नाही करत यश प्रसाद न्याला तयार झाला प्रसाद घेण्यासाठी तो उभ्या उभ्याच मानसीला भेटला, प्रसाद घेवून मानसीशी ५ मिनट बोलून तो चटकन निघून गेला, ती त्याची दुसरी भेट होती, दहा दिवसात यश शी बोलणे होणार नाही म्हणून मानसी थोडी नाराज होती, यश शी बोल्याची तिला आता इतकी सवय झाली होती कि त्याचाशी बोलली नाही तर तिला चुकल्या चुकल्या सारखा वाटायचं,पोहचल्याचा SMS कर असं मानसीने यश ला बजावले. यश ने गावावरून मानसीला दोनदा फोन हि केला गावच्या गमती जमती सांगताना तो खूप खुश होता, गावी जावून आल्यानंतर यश खूप फ्रेश असायचा, गावच्या निसर्गात सगळी tension पुसली जायची, बाईक घेवून तो एकटाच लांब भटकून यायचा, एका ठराविक कालानानात त्याच गावी जावूनच SETTLE व्ह्याचा विचार होता. गणपती जावून यश मुंबई ला परत आला, परत त्याच रुटीन चालू झालं यश कामाच्या बाबतीत खूपच PARTICULAR होता, तिथे त्याची तडजोड कधीच नसायची, ऑफिस मध्ये कोणालाही कामात मदत करायला तो तयार असायचा, अधून मधून त्याला रोह्याला हि जायला लागायचं, ऑफिस मध्ये तो सर्वाचा लाडका होता, मानसी शी ऑफिस च्या बऱ्याच गोष्टी शेअर करायचा. घरात यश च्या मोठ्या भावाच्या लग्नाची बोलणी चालू होती, दोघा भावंडामध्ये खूप प्रेम आणि सख्य होत. डिसेंबर मधलाच मुहूर्त निघाल्यामुळे खूप कमी वेळात त्यांची धावपळ होणार होती, घरातल्या गोष्टी तसा बाहेर यश कोणाला सांगत नसल्याकारणाने या विषयावर हि बोलण्याचा प्रश्नच नव्हता, मानसीला हि तो एका अक्षराने हि बोलला नाही, तसा हि तो हल्ली कमी बोलायचा जास्त ONLINE हि नसायचा. यश तसा थोडा मूडी होता, मूड असेल तेव्हा खूप बोलायचा, मधेच लहान मुलांसारखा रुसायचा.
यश च्या आणि मानसी च्या मैत्री ला आता चांगलेच ९-१० महिने झाले होते, मानसी चा आयुष्य पूर्वीपेक्षा खूप चं चांगल चालला होतं. यश थोडा गडबडीत असल्याकारणाने त्याला मानसी ला फोन करणं जमत नव्हतं, भावाच्या लग्नासाठी चांगली १० दिवसाची सुट्टी घेतली होती, मानसीला या बद्दल काहीच माहिती नसल्याकारणाने ती यश ला फोन लावंत होती पण यश काही फोन उचलत नव्हता, तिने ऑफिस मध्येहि फोन केला तिथे यश सुट्टीवर असल्याचा तिला समजलं, ऑफिस मध्ये तिने कारण विचारलं नाही, कारण माहित नसल्याकारणाने काय झालं असेल, यश ची तब्येत तर ठीक असेल ना, त्याला काही झालं तर नसेल ना, कि अजून काही प्रोब्लेम असेल एक ना दोन हजार प्रश्न मानसीच्या मनात रेंगाळत होते, त्याची खूप काळजी वाटत होती, आपल्याला यश ची एव्हडी काळजी का वाटतेय? त्याचा फोन नाही आला तर आपण बैचेन का होतो, तो काहीही बोलला अगदी रागावला तरी आपल्याला त्याचा राग येत नाही, तो सतत आपल्यासोबत असावा असं आपल्याला का वाटतेय, त्याच छान बोलणं, त्याचा सर्वाना आदर देत बोलण्याचा स्वभाव, लहान मुलांसारख मधेच रुसणं, त्याचं सुंदर दिसणं, अधिकाराने रागावणं हे सर्व आपल्याला बैचेन का करतेय, तो सतत आपल्यासोबत असावा असं आपल्याला का वाटतेय, काय झालंय आपल्याला, आपण यश च्या प्रेमात तर पडलो नाही ना, तिच्या मनात चालू असलेला गोंदल कोणाशी शेअर हि करू शकत नव्हती, त्या १० दिवसांत मानसीला प्रकर्षाने जाणीव झाली कि यशच्या मैत्रीची तिला खरच खूप गरज आहे, खूप फोन करून एकदाचा यश ने मानसीचा फोन उचलला, काय रे तब्येत बरी आहे ना, असं मानसीने काळजीच्या स्वरात विचारलं, हो, सुट्टी बाकी होती ती संपवायची होती असं कारण यश ने दिलं, यश च्या भावाचं लग्न झालं हे मानसीला ओर्कुट वर त्याच्या प्रोफाईल मध्ये समजलं, मानसीला खूप वाईट वाटला, एवडा पार्क समजतो यश आपल्याला, पण आतापर्यत त्याचं स्वभाव हि त्याला माहित झाला होता, आपल्या बदल तो कधीच जास्त कधी बोलणार नाही हे हि तिला माहित होतं, आपण यशच्या प्रेमात पडलोय हे यश ला कस सांगायचं याचीच चलबिचल तिच्या मनात चालू झाली, इतरांसारखा तिच्या मनात हि एका राजकुमारच चित्र होतं आणि यश त्यात चपलख बसत होता, यश शिवाय ती इतर कोणाजवळ हि आपला मन मोकळा करत नव्हती, काय करावा यश ला सांगावं का, सांगू नये, तो कसा REACT करेल, त्याला हे समजल्यावर तो आपली मैत्री तशीच तेवेल कि तोडून टाकेल,
आपल्याला त्याच्या मैत्रीची हि खूप गरज आहे, काय कराव, आतापर्यंत आपण त्याला फक्त दोनदाच तर भेटलो पण इतक्यांदा बोललोय, प्रतक्ष भेटून सांगावं कि फोन वर, शेवटी तिने SMS करायचा ठरवला, ३० डिसेंबर च्या रात्री तिने यश ला SMS केला, " आपण एकमेकांना जास्त ओळखत नाही, ओर्कुट वरची मैत्री आपली, पण तुझ्या मैत्रिणी ए मला बराच काही दिलंय, माझ्या हळूहळू असं लक्षात येतेय कि मला तुझी खूप काळजी वाटतेय, एक दिवस तुझ्याशी बोलले नाही तर मी बैचेन होते, तुझा आवाज ऐकावासा वाटतो, तुझ्याबरोबर सतत बोलावसं वाटते, तुझा रागावणं, तुझा चिडणं हि मला आवडून जाते, जर ह्यालाच प्रेम बोलत असतील तर मी तुझ्या प्रेमात पडलेय, तुझी प्रतिक्रिया काय असेल मला नाही माहित पण तुला हे सांगावं असं मनापासून वाटतेय, मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय" तिने घाबरत घाबरतच SMS पाटवला, SMS पाटवला खरा पण तिला आं भीती वाटायला लागली, यशला राग आला तर, तो आपल्याशी बोलायचाच बंद झाला तर, त्याने मैत्रीच संपवली तर, त्या रात्री तिला नित झोप हि नाही लागली, यश ने काही उत्तर नाही दिलं त्याने समस नित वाचला असेल ना कि ना वाचताच DELETE केला असेल, एक ना दोन हजार प्रश्नाची सरमिसळ तिच्या डोक्यात चालू झाली, दुसर्या दिवशी तिने आधी यशला फोन लावला पण त्यने फोन उचलच नाही, पूर्ण दिवसभरात त्याचा हि फोन आला नाही, आज ३१ डिसेंबर म्हणजे यश ची पार्टी जोरात असणार, मित्रांबरोबर त्याची ड्रिंक घेण्याची सवय तिला एव्हना माहित झाली होती, तरी हि रात्री घरी जाण्या अगोदर एकदा यश ला फोन करावा म्हणून तिने फोन लावला आणि यश ने फोन उचलला मानसीला खूप हायसं वाटलं, तिने घाबरत घाबरतच त्याला विचारलं तुला राग वैगरे नाही ना आला SMS वाचून, त्याने नाही म्हटल, मानसीला हायसं वाटलं, यश ने हे सर्व हसण्यावर नेलं, मानसी ने मग ड्रिंक कमी घे, घरी लवकर जा, असं यश ला बजावत फोन तेवून दिलं, यश ला राग नाही आला हे समजल्यावर तिचा जीव भांड्यात पडला होता, पण यश शिवाय आपण राहू शकत नाही याची खात्री मात्र तिला होती.
नवीन वर्षाची सुरुवात कशी होते कुणास ठावूक? यावर्षात तरी आपल्या इच्छा पूर्ण होतील का? बघू काय होते ते, रात्री १२ वाजता यश चा HAPPY NEW YEAR चा समस हि आला, दुसऱ्या दिवशी सुट्टी असल्याकारणाने ती थोडी RELAX होती, आईची तब्येत वरचे वर बरी नसते तिला चांगल्या डॉक्टर कडे न्याचय, भावाची ENGINEER ची अजून २ वर्ष बाकी आहेत त्या साठी पैशाची व्यवस्था करायचीय, नवीन वर्षात काय करायचं याच RESOLUTION मानसी कडे तयार होत, जुनं वर्ष जस हसत गेलं तास नवीन वर्ष हि हसतच आलं, जुन्या वर्षात यश सारखा मित्र दिला, नवीन वर्षात ते नातं कितपत टिकेल याचा अंदाज आताच लावणं मानसीला शक्य नव्हतं.दिवस कसे भराभर जात होते, यश पूर्वीसारखाच परत मानसी शी बोलायला लागला होता, दररोज किमान एक तास तरी बोलणं ठरलेला असायचाच, फक्त सुट्टीच्या दिवशी त्यात खंड पडत असे, जानेवारी संपून फेब्रुवारी महिना लागला हि ६ महिने झाले असतील ना यश ला भेटून मानसी नेहमी दिवस मोजत असायची,तिचा त्याच्याबद्दलचा प्रेम कमी होण्याऐवजी वाढतच चालला होत, फेब्रुवारी म्हणजे १४ फेब्रुवारी valentine चा दिवस, हा दिवस यश सोबत साजरा कराव असा मानसी मनोमन वाटत होत, पण यश तयार होणार नाही याची खात्री हि होती, यावर्षी नेमका valentine day रविवारीच आला होता, विचारव का यशला, तिने घाबरतच यशला विचारला, शनिवारी १३ तारिखला भेटशील का ? please नाही बोलू नकोस, यश ने बघू वेळ असेल तर भेटू अस सांगितल, शेवट पर्यत त्याचा बघतो बघतो असंच चालल होत पण यश येणार याची खात्री मानसीला होती, यश ला द्यायला काय बार घेवूयात, बराच विचार करून तिने त्याला गोगल घ्यायचं ठरवल , तिने त्याचसाठी साठवलेल्या पैशातून १६०० रुपयाचा गौगल आणि २ टी-शर्ट घेतल
कधी एकदा १३ फेब्रुवारी येतेय असा मानसीला झाल होत, संद्याकाळी फोन करून आपण येत असल्याच सांगितल, मानसीला स्वर्ग २ बोट उरला, शनिवारी यश ला सुट्टीच असल्याकारणाने तो घरूनच येणार होता तर मानसी ऑफिस मधून येणार होती, मानसी च ऑफिस चर्चगेट लाच असल्याकारणाने त्यांना मरीन drive ला भेटणं सोयीच होत असे, यश ला बघून मानसीला खूप आनंद झाला, तिने यश च्या आवडीची cadboury हि आणली होती, मानसीने आणलेली गिफ्ट यश ला दिली, हे कशासाठी आता हा पहिला प्रश्न होता यश चा, काही नाही रे माझ्या प्रेमाची छोटीसी भेट, पण मी अजून तुझा प्रेम स्वीकार कुठे केलाय ,
मानसी : ते तुझ्यावर आहे, मला फक्त माझा माहित,
यश : पण मी काहीच नाही आणला तुझ्यासाठी, मला असा गिफ्ट वैगरे कोणी दिला नाही आणि मीही कोणाला दिल नाही,
मानसी : आपण इथे गिफ्ट ची देवाण गेवाण करायला नाही भेटलोय,
यश : बर,
मानसी : पण कस वाटला गिफ्ट
यश : छान आहे पण टी -शर्ट थोडी मोठी असती तर चांगल झाल असत आता मला त्यासाठी बारीक व्हायला लागेल, त्याचा संभाषण असाच चालू होत, नकळत यश ने मानसीच हात आपल्या हातात घेतला, मानसीला ते पूर्णत अनपेक्षित होत , त्यानुसार त्याने तिच्या खांद्यावर हात ठेवून तिला जवळ हि घेतला, यश च्या अश्या वागण्याने मानसी सुखावली , हा क्षण असाच थाबुन राहावा असा तिला वाटत होत , यश पासून दूर व्हावं असं तिला वाटत नव्हत पण जाण भाग होत , यश ने दोघासाठी त्याच्या आवडीच आयस -क्रीम हि घेतला .यशच्या सहवासाने मानसी खुश झाली होती , तो ट्रेन मधून उतरून जायेपर्यंत ती त्याला बघत होती , दुसय्रा दिवशी तिने valentineday sms यश ला केला , यश ने हि तिला विश केल, पुढे 2 दिवस यश बोललाच नाही , त्याचा फोन हि आला नाही , मानसीने यश ला याच कारण विचारलं पण असंच म्हणून यश ने उडवून लावल.
नाही , पर्वा आपल्याला जवळ घेणारा यश अस कसा बोलू शकतो , आपल्यासोबत दररोज एवढा बोलणारा हाच का यश ? मग पर्वा घडलेला सर्व स्वप्न होत का ? मानसीला उत्तर हव होत तिने यश ला तसा समस केला " मला खरच समजत नाहीये म्हणजे तू बोललास कि आपण फक्त मित्र आहोत मग तू तुझ्या सर्व मित्र मैत्रिणीबरोबर असाच वागतोस का ? म्हणजे कुणाबरोबर कुठे गेलास कि त्याच्या खांद्यावर हात ठेवतोस मैत्रीणीना रोमांटिक मूड मध्ये चं जवळ घेत्तोस का ? तू असा हि बोललास काल पाहिलायंदच तू कुणा मुलीचा हात हातात धरला मग आपल्याशी कोणी timepass करतेय हि भावनाच तुम्हाला त्रास देते, माझा तुझ्यावर निस्वार्थी प्रेम आहे आणि ते नेहमी तसंच राहील " यावर यश ने तुला जर माझी मैत्री timepass वाटत असेल तर आपली मैत्री संपली , यापुढे मला फोन व समस करू नकोस असा समस केला , यश च्या या उत्तराने मानसी खूप डिप्रेस झाली , तिला कोणत्याही परिस्तिथ यशची मैत्री तोडायची नव्हती , हा असा कसा तोडू शकतो मैत्री अचानक , मैत्री तोडलीस म्हणजे ती ओडून ताणून केली होतीस का आतापर्यंत , मी तुझ्या मैत्रील timepass म्हटलंच नव्ह्तं मी पण किती वेडी आहे ना फक्त तुझा आवाज ऐकण्यासाठी पब्लिक बूथ वरून हि फोन करायची जेव्हा तू बोलत नाहीस , तुझ्या profile मधले तुझे फोटो माझ्या मोबाईल मध्ये टाकलेत , माहित नाहीत ते किती वेळा बघते , खूप वेड्यासारखं प्रेम केलंय तुझ्यावर पण जिथे माझ्याशी मैत्रीच करायची नाही तर प्रेम तर राहू दे . माझ्या सारख्या त्रास देणाऱ्या मुलीशी अजिबात मैत्री करू नकोस ," मानसीने काय काय लिहिल होत तिच तिलाच माहित नव्ह्तं तिचा चित्तच थारयावर नव्ह्तं, यश शिवाय आपण नाही राहू शकत याची तिला मनोमन खात्री होती , तिला जगावंसं वाटत नव्हतं . आई आणि भाऊ काही कामानिम्मित मामाच्या गावी गेले होते.
मानसी एकटीच घरी होती, dipression मध्ये मानसीने आईच्या झोपेच्या ४ गोळ्या घेतल्या, बाटलीत तेव्ड्याच शिल्लक होत्या , जास्ती असत्या तर त्या हि तिने घेतल्या असत्या , मानसीला दुसऱ्या दिवशी रात्री जाग आली , तिला अजूनही गरगरत होत , कस बस तिने स्वतःला सावरल, तीच डोक बधीर झाल होत काय करत होतो आपण, असा वेड्यासारखा पावूल कस काय उचलला आपण, आपण तर खूप strong होतो, इतक्या कठीण परिस्थितीचा सामना करून इथपर्यंत आलो आणि एका अनोळखी व्यक्तीसाठी इतकी टोकाची भूमिका , तिचेच तिला प्रश्न पडले, मानसीने यश ला sms केला तिने झोपेच्या गोळ्या घेतल्याचा . मानसी आपली मस्करी करतेय अस त्याला वाटल, पण एकीकडे मानसी अस पाऊल उचलेल हि याची खात्री हि त्याला होती, कारण आपल्या वरच्या तिच्या प्रेमाचा गहिरेपणा त्याला माहित होत, पण तो तिच प्रेम स्वीकारू शकत नव्हता , कॉलेज मध्ये असताना एक दोन जणींनी त्याला prapose हि केलं होत , पण यश ने तेव्हाही कोणाचा प्रपोजल स्वीकारला केलं नव्हतं कारण त्याच शीतल वर प्रेम होत, शीतल त्याच्या मित्राच्या बिल्डिंग मध्ये रहायची तिचा छानसं हसणं त्याला फार आवडायचं. तिला पाहण्यासाठी तो नेहमी शिवाजी पार्क च्या कट्ट्यावर जायचा , कॉलेज संपल, जबाबदाऱ्या आल्या, चांगली नोकरी लागली पण शीतल वरच त्याचा प्रेम तसच राहिल आपली जीवांसाठी असावी तर बस अशीच अस यश मनाशी धरून चालला होता , मित्राने खूप आग्रह केल्यावर एके दिवशी शीतलला विचारलच शीतल हो बोलेल असं त्याला वाटत होत , पण आपला दुसऱ्या एका मुलावर प्रेम आहे आणि पुढच्या महिन्यात आपल लग्न हि आहे अस उत्तर तिने यश ला दिला , ते ऐकून यश ला खूप वाईट वाटल आपण खूप उशीर केला का सांगायला कि आपला प्रेमच कुठे तरी कमी पडल , त्याचा प्रेमावरचा विश्वास उडाला , यापुढे आयुष्यात कोणावरही प्रेम करायच नाही त्याने मनाशी पक्का केलं, आपल्या साठी फक्त आपल्या घरची माणसच महत्वाची आहे , आपल्याला फक्त त्याचाच विचार करायचाय, आपला प्रेमावर विश्वास नाही अस त्याने मानसीला हि सांगितल होत , मानसीला परत समजाव लागणार , उद्या बोलेन तिच्याशी यश ने मनाशी ठरवल
पण कुठे तरी त्याला मानसी ची काळजी वाटतच होती . 

मानसी : thanks 
यश : का ?
मानसी : फोन केलास म्हणून 
यश : बर
मानसी : आणि एवढा छान बोललास म्हणून
यश : आभार प्रदर्शन पुरे झाल
मानसी : जे आहे ते आहे, मी कधी खोट बोलत नाही
यश : मग मी खोट बोलतो अस आहे का ?
मानसी : तू प्रत्येक गोष्टीचा वेगळा अर्थ का काढतोस मी कधी बोलले असं
यश : फक्त मीच वेगळा अर्थ काढतो का
मानसी : मग अजून कोणी काढला
यश : आताच मित्राला फोन केला होता तो म्हणाला ये न गोळी घेवून जा
मानसी : कसल्या गोळ्या
यश : झोपेच्या
मानसी : कोणाला मला देतोयास का आणून
यश : नाही माझ्यासाठी
मानसी : का तुला का
यश : असंच
मानसी : का असंच माझ्याकडे कारण आहे, तुझ्याकडे तेही नाही
यश : ते पण अनुभव घेवून बघूया न
मानसी : कसले अनुभव आणि कसले कसले घेतलेस
यश : आयुष्य दरोरोज नवे नवे अनुभव देते ना
मानसी : कोणाला एवढं छान चाललाय तुझा आयुष्य
यश : असं तुला वाटत
मानसी : मग आहे ना
यश : २० -२५ गोळ्या बस होतील न एका वेळेला
मानसी : सांगितल्यावर समजते नाही सांगितल तर सर्व छानच वाटते
यश : मग गोळ्या किती घेऊ ते सांग
मानसी : नाटक करू नकोस
यश : मला नाटक करता येत नाही , येत असता तर आता TV सेरीअल मध्ये काम केला असत
मानसी : मग एक काम कर कोणावर तरी प्रेम करून बघ
यश : का ?
मानसी : म्हणजे सगळे अनुभव आपणच येतील
यश : का जे लोक एकटे असतात त्यांना अनुभव नसतात का ?
मानसी : जरा फिलिंग समजतात ना किती दुख होता
यश : का प्रेम भंग म्हणजेच दुख का ? बाकी दुख नसतात का ?
मानसी : बाकी पचतात हळू हळू 
yasश : मग हे पण पचत ............मला माहित आहे
मानसी : कस
यश : मानसी हे दुख पचवला आहे 
मानसी : ते मला माहित आहे
यश : महणून तुला सांगतो कि वेळ हे सर्व वरचा एकमेव औषध आहे 
अरे मला पण गोळ्या घ्यायला जायचं 
मानसी : किती खोटा बोलतोस ना त्यादिवशी तर बोललास कि मी कोणाचा हाथ कधी हातात घेतला नाही 
यश : बघ मगाशी म्हणालीस कि मी असं बोलत नाही आणि आता म्हणतेस खोट बोलतोस 
मानसी : मी कारण पण सांगितल
यश : अरे पण ती माझी मैत्रीण पण नाही तर प्रपोस करताना हात हातात घेऊ का ?
मानसी : मग नंतर घेतलास ना 
यश : अरे जर माझे प्रेम तिने स्वीकार केलंच तर हात हातात कसा घेऊ 
मानसी : आपण कोणावर प्रेम करतो यापेक्षा आपल्यावर कोणी प्रेम करतेय हे हि खूप मोठ असत
यश : ते मला माहित नाही 
मानसी : तुला तर सर्व माहित असते 
यश : पण मी खोट बोलतो आहे असं जर तुला वाटत असेल तर सोडून दे 
मानसी : अरे आज नाही बोलली तर उद्या बोलेल परत शिवाजी पार्क ला जाण चालू कर ना 
यश : नको, तिचे लग्न पण झाला म्हणून सांगतो त्याचा पेक्षा हि बरीच मोठी दुख असतात
आहेस कि गेलीस बहुतेक वैतागलीस 
चाल बाय takecare ..................................................................................................................................................................................................................................................................................................................................................................................
यश पुन्हा मानसीशी पूर्वीसारखा बोलायला लागला दररोज मानसीला फोन करून मानसीशी बोलत बसायचा , त्याच रुसणं , रागावणं चालूच होत , यश चा वाढदिवस जवळ येत होता , २३ मार्च त्याचा वाढदिवस होता . यश ला वाढदिवसाला काय बर द्यावा , यश लाच विचारला तर , तिने तसं यश ला विचारल हि , पण आपल्याला काही नको हे नेहमीच उत्तर त्याने दिला , मानसी दररोज त्याला काय हवं काय हवं करून त्याला भंडावून सोडायची , शेवटी तुला जे हव ते घे , अस त्याने सांगितलं, हो पण मला ज्याचा उपयोग नाही किवा माझ्याकडे जे पहिल्यापासून आहे तेच देवू नकोस हे सांगायला हि तो विसरला नाही
यश : झाला का final तुझा गिफ्ट च 
मानसी : मी नाही तू करणार आहे ते 
यश : मला digital कॅमेरा घ्याचाय
मानसी : किती पर्यंत येतो तो ?
यश मी किंमत काढली निकॉन चा २०००० आहे
मानसी : अरे बापरे एवढ तर माझा बजेट नाही 
यश : माझ्याकडे १२००० आहेत ,
मानसी : टीक आहे वरचे मी देते ,
यश : साईट ओपेन कर आणि मला सांग कोणता घेवू ते , तुझ्या पसंतीचाच घेवू यात , असा बोलल्यावर मानसीला स्वर्ग २ बोट उरला , तिने यश ला सर्च मारून कोणता कॅमेरा घे ते सांगितलं,
मानसी : पण मधेच कॅमेरा घ्यायचा का सुचलं
यश : अरे माझा जुना कॅमेरा खराब झाला आणि पुढच्या महिन्यात गावी हि जायचं , त्यासाठी कोणत्याही परिस्तिथी मला कॅमेरा घ्यायचा आहे
मानसी ; का रे गावी का ? साखरपुडा आहे का ?
यश : नाही, काम आहे.

या गिफ्ट च्या भानगडीत यश चा वाढदिवस आला सुद्धा , मानसीने रात्री १२ वाजता समस करून विश केला , दुसऱ्या दिवशी फोन करून विश करायला हि विसरली नाही, मला वाटल तू रात्री १२ वाजता फोन करशील यश ने मानसीला विचारल, नाही र ए बाबा एवड्या रात्री तुला कुठे त्रास द्यायचा

यश : मला वाटल तू करशील
मानसी : तू भेटतोयास कधी ? आणि पार्टी देतोयस ना वाढदिवसाची 
यश : कुठे हवीय पार्टी
मानसी : तू भेट माझ्यासाठी एव्हडच बास आहे 
यश : बर या शनिवारी भेटूयात 
मानसी ने येताना यश ला द्याला ५००० रुपये आणले तिच्याकडे तेव्डेच शिल्लक होते , यावेळी ते मरीन द्रीवे ला न भेटता जवळच्या गार्डन मध्ये भेटले , यश ने न चुकता मानसीच्या आवडीचा केक आणला होता , मानसीने यश ला आणलेले पैसे दिले , यश ला घेताना थोडा ऑकवर्ड वाटत होत , त्याने ते घेतले , इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर यश ने अलगद मानसीचा हात हातात घेतला मानसी हि हळूच यश च्या कुशीत शिरली , यश च्या मिठीत तिला खूप आश्वासक वाटायचं , त्याच्या मजबूत बाहूत ती सहज विरघळायची, यश ने हळू हळू तिची चुबन घ्यायला सुरुवात केली , दोघाच्या शरीराचे स्पर्श एकमेकांना होत होते , यश च्या स्पर्शात मानसीला प्रेम जाणवल, तिच्या पूर्ण शरीरावर होणाऱ्या त्याच्या हळुवार स्पर्शाने ती सुखावली होती , हा क्षण इथेच थाबावा अस तिला वाटत होत, २ तास कसे गेले समजलंच नाही , चाल उशीर होतोय यशच्या या बोलण्याने ती भानावर आली . यश पासून दूर जायचं हि कल्पना नेहमी तिला अर्धा करयाची , पण घरी जाण भाग होत , त्याच्यापासून दूर जाताना हा पुन्हा कधी भेटेल हा प्रश्न तिला पडायचा , परत कधी भेटशील तिने यशला प्रश्न केला , यश ने बघू अस उत्तर दिल, आपण दररोज का नाही भेटू शकत , मानसीने प्रतिप्रश्न केला , प्रेमात असणारे दररोज भेटतात , आपण फक्त मित्र आहोत , हे मी तुला या आधीही हि सांगितलं मागच्या स्वप्नवत वाटणाऱ्या दुनियेतून मानसी खुदकन बाहेर आली , मी फक्त माझ्या घरच्या वर प्रेम करतो हे सांगायला यश विसरला नाही , त्याने मानसीचा निरोप घेतला , विचार करून मानसीचा डोक फुटायची वेळ आली
मग यश आपल्याशी अस का वागतो कि तो नुसताच आपल्याशी timepass करतोय तिला काहीच कळायला मार्ग नव्हता , तिने समस करून यश ला तसं विचारला हि पण तिला काहीच कळायला मार्ग नव्हता , भेटल्यानंतर यश अचानक मानसीशी बोलायचं बंद व्यायचा, फोन नाही उचलायचा, समस नाही करायचा, मानसीला या गोष्टीचा कारण कधी समजलंच नाही.

२ दिवसाने यश ने स्वताहून फोन केला, मी दादर ला चाललोय कॅमेरा बघायला येते का ? मानसीला हा धक्काच होता , यश स्वताहून बोलावतोय , मानसी ने लगेच हो म्हणून सांगितलं , तिला यश ला डोळ्यात साठवून ठेवायचं असायचं , मानसीला तस ऑफिस मधून निघायला उशीरच झाला होता , पण तरी हि यश अर्धा तास वाट बघत थांबला होता, मानसी आल्यावर चल मी निघतो , मला मित्रांबरोबर बाहेर जायचं ते वाट पाहत असतील अस बोलून तो जायला निघाला , कॅमेरा नाही घेतलास अस मानसीने विचारला , बघून आलो नंतर घेयीन, चल, अरे ५ मिनिट थांब काहीतरी खावूयात, टीक आहे जास्त वेळ नाही फक्त १० मिनिट, ते जवळच्या हॉटेल मध्ये गेले , गरमीचे दिवस असल्याकारणाने यश ने पन्ह आणि मानसीने icecreme मागवल, यश चे पन्ह लगेच पिवून झाल्यामुळे चाल लवकर संपव मला उशीर होतोय करून मागे लागला , मानसीचा आपल हळूहळू खाण चालू होत , जेणेकरून यश ची साथ तिला अजून थोडा वेळ मिळावी , यश ला राग तास पटकन यायचा , आता हि आला तू आरामत खात बस मी निघतो अस बोलून तो मानसीला हॉटेलमध्ये एकटीला सोडून निघून हि गेला, मानसीच्या डोळ्यात पटकन पाणी तराळल हा असा कसा वागू शकतो , तिने पटकन बिल दिल आणि निघाली , तिला वाटल यश निदान बाहेर तरी थांबला असेल पण नाही यश केव्हाच निघून गेला होता , त्यानंतर यश ने sorry बोलायला हि फोन नाही केला , यश कसा हि वागत असला तरी त्याच्यावरच मानसीच प्रेम कमी होत नव्हतं
त्याचं आठवणीत तिने कितेक रात्री रडून काढल्या होत्या , थोड्या दिवसाने यश गावी गेला , जाताने त्याने मानसीला साध सांगितलं हि नाही , मानसी दररोज यश च्या फोन ची वाट बघायची, त्याच्यासोबत घालवलेले क्षण आठवायची, मग पुन्हा तिची खात्री पटायची आपण यश शिवाय नाही राहू शकत , यश पुन्हा बोलायचं बंद झाला होता , त्याने आपल्या ओर्कुट च्या प्रोफिले मधून मानसीला delete केलं जिथे त्याची ओळख झाली होती , gmail मध्ये हि तिचा ID त्याने delete करून टाकला, मानसीच्या हे लक्षात आल्यावर मानसीने याचा कारण विचारल, ते चुकून झालं अस उत्तर त्याने दिल, ऑफिस मधून कोणाला हि फोन करणं आपण सोडून दिलाय म्हणून आपण फोन करत नाही असा त्याने सांगितलं, mobile चा हि काही प्रोब्लेम झालाय त्यामुळे आलेले समस आणि फोन समजत नाही अशी हि कारण त्याने दिली, मानसीने त्याच्या सर्व सांगण्यावर विश्वास टेवला, कारण तिचा यश वर पूर्ण विश्वास होता . पण ती विचार करत होती फक्त आपलाच प्रोफिईल कस काय delete होवू शकते. 

यश च्या मित्राच लग्न होत त्याचा अगदी जिवलग मित्र होता तो, त्याच्या बरोबर पत्रिका वाटण्यात, शोप्पिंग करण्यात तो बिझी होता , मित्राची मेह्वणी छान आहे असं त्याने मानसीला सांगितलं, अरे मग विचार ना तिला, बघू मित्राचा आताच तर लग्न झालं विचारू सावकाश , यश च्या या उत्तराने मानसीला वाईट वाटल, यश कधी तरी बोलायचा, फोन करणं तर त्याने बंदच केला होत, कधी तरी खूप समस करायचा, हल्ली त्याला कामानिमितात बऱ्याच वेळेला रोह्याला जायला लागायचा , तिथे असला कि तो रात्री २ वाजेपर्यंत मानसीला समस करत बसायचा, ३ महिने झाले होते यश ला भेटून , मानसीला यश ला बघावास वाटत होत, तुला शेवटचा बघायचं, भेटशील का ? तिने यश ला विचारल, यश ने नाही म्हणून उत्तर दिल, यश ची गावी जायची लगबग चालू होती , गेल्यावर्षीप्रमाणे यावर्षी हि यश च्या गणपतीला प्रसाद द्यावा असा तिला मनोमन वाटत होत , तिने तसं समस करून यश ला विचारल, टीक आहे दे म्हणून त्याने सुरुवातीला सांगितलं, काय प्रसाद देणार आहेस ? जास्त काही नाही गणपतीसाठी जास्वंदीचा फुल द्यायचं चांदीच, तू नेशील ना ?
यश ने लगेच नकार दिला, आमच्या गणपती साठी प्रसाद द्यायची काही गरज नाही , तू मुंबईतल्या कुट्च्याही गणपतीला दे , मी प्रसाद घेवून जाणार नाही आणि मला याच कारणही विचारू नकोस , यश ने मानसीला कारण सांगितलाच नाही , मानसीला खूप वाईट वाटल, तिला कोकणातल्या गणपतीला ते फुल द्यायचं होत , ती तिच्या बाबाच्या गावी कधी गेली नव्हती, मामाकडे /मावशीकडे जायची पण ते शेवटी परकेच, कदाचित गणपती बाप्पाला आपला प्रसाद मंजूर नसावा , असा स्वत स्वतालाच तिने समजावल.

यश नेहमीप्रमाणे गावी जावून एन्जोय करून आला, गणपतीचे ५ दिवस कसे जायचे त्याला समजायचं नाही , मुंबईतली सारी tension तो मुंबईत ठेवून यायचा, गावच्या वातावरणात फ्रेश झाला कि नव्या जोमाने तो कामाला लागायचा, यावेळी हि असंच झाल, मानसीला यश ची सतत काळजी वाटायची, त्याला बर नसेल तर ती अस्वस्थ असायची , यश ने न सांगता हि तिला कळायच, कदाचित त्याच्यावर करत असलेल्या निस्सीम प्रेमामुळे असेल हि कदाचित . यश गावावरून आल्यानंतर मानसीने त्याला फोन केला , तो कसा हि वागला तरी तिला त्याचा राग नाही यायचा, असायची ती फक्त काळजी . खूप विचारून यश शेवटी भेटायला तयार झाला , मानसीला खूप आनंद झाला, मला तुला काही तरी द्यायचा, काय हवाय तुला? मला काही हि नको यश बोलला, पण मला द्यायचा आहे ना , यश : मग दे , मानसी : तेच विचारतेय काय देवू , काय हवाय , यश : ipod घ्यायचा देतेस का ? मानसी : किती पर्यंत येतो तो ? यश : जास्त नाही १०००० -१५००० पर्यंत येतो , मानसी : अरे बापरे , तरी तिने बघते अस उत्तर यश ला दिलं, यश ने काहीतरी मागितलंय आपल्याकडे, आपल्याला द्यायला जमेल का ? बघू प्रयत्न करू , मानसीकडे साठवलेले ५००० रुपये होते , यातच आता काहीतरी द्यायला हव , दादर ला उतरल्यावर तिने यश ला फोन केला ,
मानसी : कुठे आहेस

यश : घरी ,

मानसी : काय करतोयस ,?

यश : ड्रिंक 

मानसी : काय ? तू बरा आहेस न काही तरी काय बोलतोयस ?

यश : जे आहे तेच बोलतोय , तुला विश्वास ठेवायचा असेल तर ठेव नाहीतर सोडून दे ..

मानसी : पण घरी कोणी नाहीत का ?

यश आहे भाऊ आहे वहिनी आहे , फक्त आई बाबा बाहेर गेलेयत,

मानसी : मग जरा कमी पी , तुला apple चाच ipod हवाय का, दुसऱ्या कंपनी चा नाही चालणार का ? माझ्याकडे सध्या जास्त पैसे नाहीत

यश : मी तुला सांगितला का याच कंपनी चा घे म्हणून , आणि मला काही हि नकोय 

मानसी : हे तुझा नेहमीचा, मनात असेल तरी बोलणार नाही, जावू देत मी बघते पण तू जरा कमी पी .

मानसीने 4000 चा mp3 घेतला.
पाऊस नसेल तर शनिवारी भेटूयात यश ने मानसीला सांगितलं , यश भेटणार म्हणून मानसी खूप खुश होती , गेल्या वेळी ते जिथे भेटले होते तिथेच या वेळी हि भेटले , यशला भेटायच्या आधी त्याला बरेच प्रश्न विचारयाचे, आपल्या सगळ्या प्रश्नाची उत्तर त्याच्याकडून घ्यायची अस ती मनोमन ठरवायची, पण यश समोर येताच ती जणू अबोल व्यायची, तू बोल मी ऐकतेय , असाच तिचा चाललेलं असायच , मानसीने आणलेला MP3 त्याला दिला , यश ला ipod हवा होता त्यामुळे मानसीने आणलेला MP3 त्याला तितकासा आवडला नाही पण तोंडदेखल तो चांगला आहे म्हणाला, मानसीला त्याचं चेहऱ्यावरचे बदलेले भाव लगेच समजले , पण तिचाही काही इलाज नव्हता, तिच्या बजेट मध्ये तोच आला , यशच्या कुशीत शिराव असं तिला फार वाटत होत , त्याचा जरी तिच्यावर प्रेम नसल तरी यश वरच्या प्रेमामुळे तिला अस वाटणं स्वाभाविक होत, त्याच्या शिवाय दुसरया कुणाचा विचार तिच्या मनाला शिवत हि नव्हता आणि कधी शिवणार हि नव्हता. यश न जस मानसीच्या मनातला लगेच ओळखल , त्याने तिला लगेच आपल्या मिठीत घेतलं, यश च्या मिटीत शिरताच मानसी विरगळून गेली, त्याने तिची खूप सारी चुबन घेतली, यशच्या स्पर्शात एक मृदुता होती , त्यच्या स्पर्शात तिला कधीच लालसा जाणवली नाही , जाणवणं ते फक्त प्रेम , त्याच्या डोळ्यात हि वाचू शकत होती पण यशच्या काही हि न बोलणं तिला कोड्यात टाकायच, यश च्या कुशीत असतानाच आपल्याला मुर्त्यू आला तर किती छान होयील ना हा विचार तिच्या मानत १०० वेळा येवून गेला , चल बराच उशील झालाय , निघू या , यश च्या या बोलण्याने ती भानावर आली , आता पुन्हा बोलायचा बंद होशील ना, असा तिने यश ला बोलूनही दाखवलं, त्यावर यश फक्त हसला, का माहित नाही पण यश आपल्याला आता कधीच भेटणार नाही अशी भीती तिला वाटत होती , नेहमीप्रमाणे यश पुन्हा बोल्याचा बंद झाला , कधी तरी मूड असेल तेव्हाच तो मानसीच्या समस ला उत्तर करायचा , तू खूप irrited करतेस, मी बोअर होतो तुझ्याशी बोलायला असं त्याने मानसीला बोलून हि दाखवलं, मानसीला खूप वाईट वाटल , ते ऐकून आपला एवढा त्रास होतो यश ला तर मग आपण का त्याला त्रास द्यायचा ?
तिने बऱ्याच वेळेला यश ला विसरण्याचा प्रयत्न हि केला पण दरवेळी ती अधिका अधिक यश च्या प्रेमात पडत गेली, आपण नाही विसरू शकत यश ला त्याच्या आठवनिवरच आपल्याला जगावं लागेल

यश चा आपल आयुष्य खूप छान चालल होत , त्याने मानसीशी बोलणं पूर्ण पणे बंद केल, मानसी कशी असेल , तिने काही वेडावाकडा काही केला तर नसेल ना, असा विचार एकदाही त्याच्या मनात आला नाही, इथे मानसी मात्र दिवसे दिवस खचत चालली होती , यश ने एकदा तरी फोन करावा , निदान मैत्री तरी तशीच ठेवावी असा तिला वाटत होत, तीच कामात हि लक्ष लागायचा नाही , मग कामात चुका व्यायला लागल्या, अशातच तिच्या आईला हृदय विकाराचा झटका आला, आईच्या आजारपणाने ती अजूनच खचली , आईच्या सेवेत तिने स्वतःला रात्र दिवस झोकून दिल, भाऊ होता, पण यावेळी तिला कोणाच्या तरी आधाराची गरज वाटत होती , यश ने एकदाच फोन करून विचारला असता तरी तिला धीर आला असता तिने यश ला आईच्या आजारपणाचा समस हि केला पण यश ने साधी चौकशी हि केली नाही , मानसीचा मन आतल्या आत रडत होत, देवाच्या कृपेने तिची आई बरी झाली पण तिची काळजी खूप घ्यायला हवी होती मानसीने स्वतःला आईच्या सेवेत झोकून दिलं, पण ती स्वत मात्र खूप डिप्रेस झाली , जवळ जवळ ४ महिने झाले ती यश शी बोल्ल्याला, तो कसा असेल , काय करत असेल , त्याची खूप काळजी वाटत होती पण फोन करून विचारू हि शकत नव्हती, आई आता थोडी बरी होती , त्यामुळे मानसीची थोडी काळजी कमी झाली होती, घर चालवण्यासाठी तिला ऑफिस ला जाण भाग होत, तिच रुटीन चालू झालं, आता कुणाशी हि मैत्री करायची नाही असा तिने ठरवल होत.
आज मानसीचा वाढदिवस होता, निदान आज तरी यश फोन करेल अशी वेडी आशा तिला वाटत होती , गेल्यावर्षी सर्वात प्रथम यश ने तिला विश केलं hot, संध्याकाळ पर्यंत ती त्याच्या फोनची वाट बघत होती, निदान समस तरी, पण यश चा समस हि आला नाही, एवड्या लवकर विसरला यश आपल्याला , एवढी आपली मैत्री , आपला प्रेम खोट होत का ? तिच्या मनात गोधळ चालू होता, चार चौघीसारखा आपण हि छान संसार करावा , कोणावर तरी भरभरून प्रेम कराव, एवढी माफक अपेक्षा होती तिची, त्या दिवशी ती खूप रडली, असा वाढदिवस कधीच तिचा गेला नव्ह्ता, विचार करत करतंच ती स्टेशन ला उतरली, आज तिला ब्रिज चढायचा कंटाळा आला होता, ट्रक क्रॉस करून जावूयात का ? असा विचार तिने केला, ट्रक क्रॉस करत असताना ती आपल्याच तंद्रीत होती, मागून धडधड करत येणाऱ्या गाडीचा आवाज हि तिच्या कानात शिरत नव्हता आणि अचानक एक किंकाळी लोकांना ऐकू आली , ट्रेन ने मानसीला धडक दिली होती , लोकांनी प्रचंड आरडओरड केली, पण मानसीच्या कानात काहीच शिरल नाही, तिचा शरीर कुठल्याकुठे जावून पडल.

एका प्रेमाचा असा करुण अंत झाला, मानसी निपचित पडली होती, तिच्या पर्स मध्ये असणाऱ्या तिच्या कार्ड वरून पोलिसांना तिच्या घरचा पत्ता भेटला बातमी ऐकून तिच्या भावाला धक्काच बसला, तो मटकन खालीच बसला, आईला कस समजावयाच, तिला कस सांगायचं हे त्याला कळत नव्हतं पण सांगणं भाग होत, मानसीच्या आईला हि बातमी कळली तेव्हा त्यांची शुद्धच हरपली, आधीच त्यांना attack येऊन गेला होता, डॉक्टरांना तातडीने बोलावण्यात आला, त्यांना वेळीच उपचार केल्यामुळे मानसी ची आई सावरली
अरे हो काल तर मानसीचा वाढदिवस होता , आपण विसरूनच गेलो होतो, आपण तिला विश हि केला नाही जावू देत आता करूयात, पण मानसीने एवढे फोन का केले होते काल आपल्याला , म्हणून यश ने तिच्या मोबिईल वर फोन लावला पण तिचा फोन स्वीच ऑफ येत होता, म्हणून त्याने तिच्या ऑफिस ला फोन लावला तिथे त्याला मानसी ट्रेन अपघातात गेल्याची बातमी समजली , यश ला हि घटना अनपेक्षित होती , त्याने मानसीच्या घरचा पत्ता मागून घेतला निदान शेवटच तिला बघाव म्हणून तो मानसीच्या घरी पोहचला, तिथला चित्र हृदयद्रावक होत, मानसीचा देह निपचित पडला होता, मानसीचा तो अचेतन देह पाहून त्याच्या डोळ्यात नकळत पाणी आलं आपल्यावर भरभरून प्रेम करणारी, आपल्या मुळे गेली का ? असा एकदा विचार आला त्याच्या मनात पण नंतर त्याने तो विचार मनातून कडून टाकला, आपण तर मानसीला नाही म्हणून सांगितलं होतच, एका प्रेमाचा दुर्दावी अंत झाला होता
कोण जबाबदार होत या सर्वाला, चटकन कुणावर हि विश्वास ठेवणारी आजची पीडी कि इंटरनेट च्या मायाजालात अडकलेलो आपण सर्व ……..???????????????

Top of Form

 

Bottom of Form